
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक हृद्य क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका तरुणीने लोकल ट्रेनमध्ये गोड गाणे गात प्रवाशांचे मन जिंकले. या अनोख्या संगीतमय अनुभवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकजण तिच्या गायनाचे कौतुक करत आहेत. या गाण्याने प्रवाशांचा थकवा दूर करून त्यांना काही क्षणांसाठी आनंद दिला.
मुंबई लोकल ट्रेनमधील असे प्रसंग नेहमीच सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधून घेतात, आणि हा व्हिडिओ त्याचे आणखी एक उदाहरण ठरला आहे. लोकल ट्रेनच्या गडबडीतही संगीताने आनंदाचा क्षण निर्माण केल्याने हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला जात आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकल ट्रेन दिसत आहे.
मात्र, ही लोकल ट्रेन दुसऱ्या कोणत्या शहरातील नसून मुंबई शहरातील आहे. व्हिडिओत पुढे तुम्हाला पुरुष कंपार्टमेंट दिसत आहे, ज्यात एक तरुणी खिडकीकडे उभी राहून गाणं गात आहेत. प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत असून ती तरुणी एका जागी उभी राहून, "आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का?" हे गाणं गात आहे. तसेच ही तरुणी सुंदर साडी परिधान केल्यामुळे आणखी देखणी दिसत आहे.
मुंबई लोकल ट्रेनचा व्हिडिओ फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ फेसबूकवरील "Sanika Kanase" या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये, "आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का? सानिकाताईंनी गायली अप्रतिम गौळण" असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ७ हजारहून अधिक लाईक्स तर मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.