Viral Video: माकडाने हिसकावला परदेशी महिलेचा iPhone; परत मिळवण्यासाठी लढवली शक्कल, पाहा व्हायरल VIDEO

Monkey Viral Video: व्हिडिओमध्ये माकड अगदी आरामात फोन हातात घेऊन इकडे तिकडे पाहत असताना दिसत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
Viral Video
Viral Video
Published On

केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे माकडे खूप खोडकर असतात. संधी मिळताच वस्तू हडप करण्यापासून ते मागे हटत नाहीत. तुम्ही वृंदावनचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात माकडे फळे किंवा कोल्ड्रिंक्सच्या बदल्यात हिसकावून घेतलेल्या वस्तू परत करतात. पण सध्या बालीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये माकडाने एका महिलेचा आयफोन हिसकावून घेतल्याचे तुम्हाला दिसेल. आयफोन हिसकावून घेतल्यानंतर तो पुन्हा पुन्हा स्क्रॅच करण्याचा प्रयत्न करत आहे. ती महिला कधी चष्मा तर कधी बिस्किटांचे आमिष दाखवून माकडाकडून तिचा फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करते. या महिलेच्या मदतीसाठी इतर अनेक लोकही तेथे पोहोचतात. व्हिडिओमध्ये माकड अगदी आरामात फोन हातात घेऊन इकडे तिकडे पाहत असताना दिसत आहे. सगळी लालूच दाखवूनही माकड IPhone द्यायला तयार नाही. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Viral Video
Viral Video: सापाशी मस्ती करणं आलं अंगलट, त्याच्या खेळ त्याच्यावरच उलटला; पाहा VIDEO

या दरम्यान मजेची गोष्ट अशी की माकड बिस्किट घेतो पण फोन काही सोडत नाही. अनेक वेळा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल की माकड फोन फेकून देईल. ती महिली आणि इतर लोकही त्याला फूस लावण्याचा प्रयत्न करतात पण तो कोणाच्याही मोहात पडत नाही. हा व्हायरल झालेला व्हिडीओ खूपच मजेदार आहे.

Viral Video
Viral Video: थंडीपासून वाचण्यासाठी माणसाने उचललं घातक पाऊल, VIDEO पाहून डोक्याला हात माराल

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये असेही म्हटले आहे की, फोनच्या बदल्यात माकडांना अनेक किलो फळे द्यावी लागतात. साहसी बजेटसोबतच फळांचे बजेटही खूप महत्त्वाचे असते. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे - माकडाला त्याच्या हातात अन्न द्यावे लागले जेणेकरून तो फोन सोडून अन्न हिसकावू शकेल.

Viral Video
Tourist Destinations : 2024 मध्ये ही पर्यटनस्थळं ठरली सुपरहिट, तुम्ही इथे गेलात का? यादी बघा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com