Viral Video: स्कूटर चालवत असताना अचानक पडला बेशुद्ध, हेल्मेट काढल्यावर हेल्मेटचा आतील भाग पाहून थक्क, पाहा व्हायरल VIDEO

Baby Cobra In Helmet: एक व्यक्ती स्कूटर चालवत असताना अचानक बेशुद्ध पडतो. मदतीसाठी काही लोक पुढे येऊन स्कूटरवरून उतरवून त्याचे हेल्मेट काढतात. मात्र, हेल्मेट उघडताच आतील दृश्य पाहून सर्वजण थक्क होतात.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

नुकताच सोशल मीडियावर एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटर चालवत असताना अचानक बेशुद्ध पडतो. परिस्थिती पाहून काही लोक त्याला मदतीसाठी पुढे सरसावतात आणि त्याला स्कूटरवरून उतरवून जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, व्यक्तीचे हेल्मेट काढल्यावर आत पाहून त्यांचे होश उडतात. या विचित्र घटनेने लोकांना धक्का बसला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. हा प्रसंग गंभीर असूनही हास्यास्पद वाटतो, त्यामुळे तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. व्हिडिओमध्ये स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीच्या हेल्मेटमध्ये एक बेबी कोब्रा लपून बसल्याचे दिसते. हेल्मेट उघडताच लोक थक्क होतात आणि तत्काळ सर्पतज्ज्ञांना बोलावले जाते. सर्प हाताळणाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक सापाला हेल्मेटमधून बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. हा व्हिडिओ ट्विटरवर हँडलवर शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत १ लाख २८ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा प्रसंग पाहून लोक आश्चर्यचकित होत असून या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

Viral Video
Viral Video: भयंकर! चक्क विजेच्या तारेवर कपडे सुकवले; म्हणाला- करंट नाही, पाहा व्हायरल VIDEO

व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनने अधिक चर्चा निर्माण केली आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "हा दक्षिण भारतातील व्हिडिओ आहे, जिथे एका व्यक्तीच्या हेल्मेटमध्ये बेबी कोब्रा लपून बसला होता आणि त्याने त्या व्यक्तीच्या डोक्याला चावा घेतला. हेल्मेट किंवा कोणतीही वस्तू घालण्यापूर्वी ती व्यवस्थित हलवून तपासावी.

Viral Video
Viral Video: माकडाने हिसकावला परदेशी महिलेचा iPhone; परत मिळवण्यासाठी लढवली शक्कल, पाहा व्हायरल VIDEO

बेबी कोब्रा हे मोठ्या कोब्रा सापांपेक्षा अधिक विषारी असतात आणि सहसा हेल्मेट, शूज किंवा इतर वस्तूंमध्ये लपून बसतात. त्यामुळे अशा वस्तू स्वच्छ करूनच परिधान कराव्यात. या कॅप्शनने अनेकांना जागरूक राहण्याची प्रेरणा दिली असून, व्हिडिओने लोकांना त्यांच्या दैनंदिन वस्तूंसंदर्भात अधिक सावध होण्याचा सल्ला दिला आहे.

Viral Video
आईपण भारी देवा! वासराला २०० मीटरपर्यंत लांबपर्यंत ओढत नेले, गायीच्या कळपाने कारला घातला वेढा; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com