Viral Video: शाहरुख खान सोबत 'छोटा पाहुणा', सुट्टीनंतर मुंबईत परतताना सुंदर क्षण, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video Od Shahrukh Khan: शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाने अलिबागमधील फार्महाऊसवरची सुट्टी संपवून मुंबईत परतल्यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान कुटुंबासोबत अलिबागमधील फार्महाऊसवर सुट्टी घालवून मुंबईत परतला आहे. यावेळी शाहरुख आपल्या पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, आणि लहान मुलगा अबरामसोबत दिसला. या प्रवासात कुटुंबात एक नवीन सदस्यही सामील झाला, जो म्हणजे त्यांच्या घराचा पाळीव श्वान.

शाहरुख खानने स्वतः त्याला हातात उचलले होते. बोटीतून उतरल्यानंतर शाहरुख आपल्या लाडक्या पिल्लाला हातात घेत गाडीत बसला. प्रवासादरम्यान, शाहरुखने पापाराझी आणि चाहत्यांपासून स्वतःला लपवण्यासाठी काळ्या रंगाच्या लांब जॅकेटने झाकून घेतले होते. यावेळी हा गोड क्षण चाहत्यांसाठी चर्चा का विषय ठरला.

Viral Video
Viral Video: स्कूटर चालवत असताना अचानक पडला बेशुद्ध, हेल्मेट काढल्यावर हेल्मेटचा आतील भाग पाहून थक्क, पाहा व्हायरल VIDEO

शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाने अलिबागमधील फार्महाऊसवरची सुट्टी संपवून मुंबईत परतल्यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. शाहरुखच्या पाळीव कुत्र्याच्या गोड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेक चाहत्यांनी त्याला 'क्यूट' म्हणून कमेंट केल्या आहेत. यावेळी सुहाना खान आणि तिचा कथित बॉयफ्रेंड, अभिनेता अगस्त्य नंदा यांचाही एकत्र फोटो सोशल मीडियावर फिरत आहे.

अगस्त्य ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये मस्त दिसत होता, तर सुहाना ब्लॅक क्रॉप टॉप आणि ब्लू डेनिममध्ये आकर्षक दिसली. सुहाना दुसऱ्या गाडीतून घरी निघाली, आणि चाहत्यांनी त्यांचे व्हिडिओ एक्सवर शेअर केले, जे तुफान व्हायरल झाले आहेत.

Viral Video
Viral Video : आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का? लोकलमध्ये तरुणीने 'गवळण' गायली, प्रवाशांनीही धरला ताल

शाहरुख खान दरवर्षी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून कुटुंबासोबत सुट्टी घालवतो. यावेळी, ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी त्याने कुटुंब आणि मित्रांना अलिबागमधील आपल्या फार्महाऊसवर घेऊन जाताना आनंद घेतला. पण, या फॅमिली टाइममध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खान उपस्थित नव्हता, ज्यामुळे चाहत्यांनी 'आर्यन कुठे आहे?' असा प्रश्न विचारला. अनेकांनी अनुमान व्यक्त केले की, आर्यन सध्या एका वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळे तो कुटुंबासोबत हा वेळ घालवू शकला नाही. आर्यन लवकरच त्याच्या प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे.

Viral Video
Viral Video: भयंकर! चक्क विजेच्या तारेवर कपडे सुकवले; म्हणाला- करंट नाही, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com