पाकिस्तानचे 25 जवान ठार! लष्कर प्रमुख मुनिरला दिलं खुलं आव्हान

BLA Claims 25 Pakistan Army Personnel Killed In Two Separate Attacks: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्याला मोठा धक्का बसल्याचा BLAचा दावा आहे. दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत 25 पाकिस्तानी जवान ठार झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.
BLA claims 25 Pakistani soldiers killed in two separate attacks
BLA claims 25 Pakistani soldiers killed in two separate attackssaam tv
Published On

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्याविरोधात मोठा केल्याचा दावा केला आहे. दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे तब्बल 25 जवान ठार झाल्याचा दावा BLA कडून करण्यात आला आहे. बलुचिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार वाढला असून, BLA ने पाकिस्तानी सैन्याविरोधातील आपले लढाई अधिक तीव्र केली आहे. BLA ने शुक्रवारी दावा केला की, झियारत क्रॉसजवळ त्यांच्या फतेह स्कॉडच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात सैन्याची दोन वाहने उद्ध्वस्त झाली असून, 18 पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. तर पाच जवान जखमी झाले असून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे BLA ने म्हटले आहे.

BLA claims 25 Pakistani soldiers killed in two separate attacks
Pakistan : पाकिस्तानी लष्करावर भीषण हल्ला; बलुचिस्तानमध्ये २५ जवान ठार, गाड्या पेटवल्या अन्...

या हल्ल्याचा एक कथित व्हिडिओ BLA च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या गाड्या आणि घटनास्थळी सशस्त्र BLA चे जवान दिसत आहेत.

BLA claims 25 Pakistani soldiers killed in two separate attacks
पाकिस्तानचे झाले २ तुकडे? नव्या देशाची स्थापना, जाहीर केला स्वतःचा स्वातंत्र्यदिन; शाहबाज शरीफ सरकार हादरले

फतेह स्कॉड पुन्हा चर्चेत

या हल्ल्यानंतर BLAचे फतेह स्कॉड पुन्हा चर्चेत आले आहे. ही विशेष लढाऊ युनिट बलुचिस्तानच्या डोंगराळ भागात कार्यरत असल्याचे सांगितले जाते. गुरिल्ला युद्धपद्धती आणि घात करून हल्ला करण्यात ही युनिट विशेषत: प्रशिक्षित असल्याचा दावा केला जातो. मार्च 2025 मध्ये झालेल्या जाफर एक्सप्रेस अपहरणाच्या घटनेमागेही याच युनिटचा हात असल्याचा दावा करण्यात आला होता.

BLA claims 25 Pakistani soldiers killed in two separate attacks
Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

दरम्यान, सुरबच्या हाजिका भागात झालेल्या आणखी एका हल्ल्याची जबाबदारीही BLAने स्वीकारली आहे. BLAच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या STOS (Special Tactical Operations Squad) युनिटने रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून चालणाऱ्या वाहनाचा वापर करून स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे सात जवान ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दोन्ही हल्ल्यांमधील मृतांची संख्या स्वतंत्रपणे किंवा अधिकृतपणे अद्याप निश्चित झालेली नाही. पाकिस्तान सरकार किंवा सैन्याकडून या हल्ल्यांबाबत तत्काळ सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com