पाकिस्तानचे झाले २ तुकडे? नव्या देशाची स्थापना, जाहीर केला स्वतःचा स्वातंत्र्यदिन; शाहबाज शरीफ सरकार हादरले

Republic of Balochistan declaration : बलुच नेत्यांनी 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान'ची घोषणा करत ११ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्वतंत्र राष्ट्राला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याची मागणी केली.
Baloch leaders announce Independence Day
Baloch leaders announce Independence Day Saam TV
Published On

Baloch leaders announce Independence Day : भारताच्या विभाजनाची स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानचे २ तुकडे झाले आहेत. बलूचिस्तान प्रांताने पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळे होत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ११ ऑगस्ट हा आपला 'स्वातंत्र्यदिन' म्हणून साजरा करण्याची मोठी घोषणा केली आहे. 'रिपब्लिक ऑफ बलूचिस्तान' या नावाने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले आहे. बलूच नेत्यांनी आता जागतिक समुदायाकडून एका स्वतंत्र आणि सार्वभौम देशाची अधिकृत मान्यता मागितली आहे. या निर्णयामुळे आधीच राजकीय आणि आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.

बलूच स्वातंत्र्याचे प्रमुख नेते मीर यार बलूच यांनी जगातील सर्व बलूच नागरिकांना येत्या ११ ऑगस्ट रोजी आपापल्या घरावर, दुकानांवर, शाळांवर आणि सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र बलूचिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. १९४७ मध्ये ब्रिटीश राजवटीचा अंत होत असताना १४ आणि १५ ऑगस्टच्या आधी म्हणजेच ११ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांनी बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली होती. मात्र १९४८ मध्ये पाकिस्तानने लष्करी ताकदीचा वापर करून बलूचिस्तानवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला, असा आरोप बलूच नेत्यांनी केला आहे.

बलुचिस्तानला अद्याप कोणत्याही देशाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिलेली नाही.

Baloch leaders announce Independence Day
पेट्रोलवर प्रति लिटर ₹३.५ आणि डिझेलवर प्रति लिटर ₹२४ कर, सरकारने घेतला मोठा निर्णय

बलूच संघटनांच्या मते, गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानने या भागात हिंसाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि शोषणाचे धोरण राबवले आहे. दक्षिण आशियात शांतता आणि स्थिरता हवी असेल, तर स्वतंत्र बलूचिस्तान आवश्यक आहे, असे सांगत बलूच नेत्यांनी संपूर्ण जगातील देशांना आणि संयुक्त राष्ट्रांना (UN) बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. बलुचिस्तान प्रजासत्ताकाने लोकांना बलुच ऐक्य दाखवून ११ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

Baloch leaders announce Independence Day
Maharashtra weather : पुण्यासह १० जिल्ह्यांत मुसळधार पाऊस हजेरी लावणार, हवामान विभागाचा अंदाज

बलुच नेते मीर यार बलुच म्हणाले की, ११ ऑगस्ट रोजी सर्व बलुच नागरिकांनी आपापल्या घरांवर स्वतंत्र बलुचिस्तानचा ध्वज फडकवावा. वस्त्यावर, बाजारपेठांमध्ये, दुकानांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बलुचिस्तान प्रजासत्ताकाचा ध्वज फडकवला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्या निवेदनात मीर यांनी म्हटले की, स्वातंत्र्य दिन आता दरवर्षी ११ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. त्यांनी पुढे सांगितले की, परदेशात राहणारे बलुच नागरिकही याच दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतील.

पाकिस्तानच्या धोरणांचा फक्त बलुचिस्थानमध्येच नाही, तर तर परदेशातही भयंकर परिणाम झाला आहे. काश्मीरवरून विषारी टीका करणे, बलुचिस्तानमधील लष्करी कारवाई, सोव्हिएत-अफगाण युद्धातील सहभाग किंवा अणुचाचण्या, पाकिस्तानच्या धोरणांमुळे फक्त रक्तपातच झाला आहे, असे मीर यांनी म्हटलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com