Maharashtra weather : पुण्यासह १० जिल्ह्यांत मुसळधार पाऊस हजेरी लावणार, हवामान विभागाचा अंदाज

IMD weather forecast for Maharashtra today : पुण्यासह महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांत आज मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून ६ ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी होऊन हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
IMD weather forecast for Maharashtra today
IMD weather forecast for Maharashtra todaySaam TV marathi
Published On

Maharashtra Rain Forecast Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सक्रिय असलेल्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात १० जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण त्यानंतर पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पूर्णपणे ओसरून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

आज कुठे होणार पाऊस?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. त्याशिवाय विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. यात प्रामुख्याने यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

IMD weather forecast for Maharashtra today
Parking Rules : सोसायटीतील पार्किंगवरून वाद, फ्लॅट घेतल्यानंतर गाडी कुठे उभी करायची? पाहा काय सांगतो नियम

पुढील तीन दिवसांची स्थिती काय?

५ ऑगस्ट २०२६:

उद्या विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी कायम राहील. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे.

६ ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर पूर्णपणे कमी होणार आहे. ६ आणि ७ ऑगस्ट रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्येही पावसाची कोणतीही मोठी चेतावणी देण्यात आलेली नाही.

IMD weather forecast for Maharashtra today
Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

विदर्भ आणि घाटमाथ्यावरील नागरिकांनी आज आणि उद्या बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी. तर ६ ऑगस्टनंतर पावसात मोठी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. ज्या भागात पाऊस थांबेल तिथे शेतकऱ्यांना शेतीची रखडलेली कामे उरकून घेण्यास मदत होणार आहे. पावसाळा सुरू होऊन २ महिने उलटले आहेत, पण अद्याप अर्ध्या महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील उर्वरित भागात पावासाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com