पेट्रोलवर प्रति लिटर ₹३.५ आणि डिझेलवर प्रति लिटर ₹२४ कर, सरकारने घेतला मोठा निर्णय

India windfall tax on petrol exports : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये मोठी वाढ केली आहे. ३ ऑगस्टपासून पेट्रोलवर ₹३.५ आणि डिझेलवर ₹२४ प्रति लिटर कर लागू झाला.
India windfall tax on petrol exports
India windfall tax on petrol exports Saam Tv
Published On

Windfall Tax, Petrol Export Tax : पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर (Export) आकारल्या जाणाऱ्या ‘विंडफॉल टॅक्स’मध्ये केंद्र सरकारने मोठी वाढ केली आहे. हे नवीन दर ३ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. आता नव्या निर्णयानुसार पेट्रोलच्या निर्यातीवरील टॅक्स प्रति लिटर २.५ रुपयांवरून ३.५ रुपये, तर डिझेलवरील टॅक्स प्रति लिटर १५.५ रुपयांवरून थेट २४ रुपये करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होणारे बदल आणि तेल कंपन्यांना मिळणारा अतिरिक्त नफा लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या टॅक्सवाढीमुळे निर्यात करणाऱ्या तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होणार असला, तरी देशांतर्गत बाजारातील सामान्य नागरिकांसाठीच्या पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ दरांवर याचा कोणताही थेट परिणाम होणार नाही.

भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेल निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स वाढवला आहे. ३ ऑगस्टपासून हा बदल लागू झाला आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती, निर्यातीतील नफा आणि सध्याची जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे.

India windfall tax on petrol exports
Maharashtra weather : पुण्यासह १० जिल्ह्यांत मुसळधार पाऊस हजेरी लावणार, हवामान विभागाचा अंदाज

प्रत्येक २ आठवड्यानंतर केंद्र सरकारकडून पेट्रोलियम उत्पादनांवरील विंडफॉल टॅक्सचा आढावा घेतला जातो. जर वाढत्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमुळे रिफायनिंग कंपन्या आणि तेल उत्पादकांना नेहमीपेक्षा जास्त नफा झाला, तर सरकार त्या अतिरिक्त उत्पन्नाचा काही भाग कर म्हणून वसूल करते. या कराला विंडफॉल टॅक्स म्हणतात.

India windfall tax on petrol exports
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ₹१५००; जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

तेल कंपन्यांच्या निर्यात नफ्यावर होणारा परिणाम

तज्ज्ञांच्या मते या दरवाढीचा तेल कंपन्यांच्या निर्यात नफ्यावर थेट परिणाम होऊ शकतो. पण देशांतर्गत बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर याचा कोणताही तात्काळ थेट परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण भारतातील इंधनाच्या किमती इतर अनेक घटकांवर अवलंबून असतात. येत्या काही दिवसांत बाजारपेठ जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि सरकारच्या पुढील आढाव्यावर बारकाईने लक्ष ठेवून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com