भाजप युवा मोर्चा अध्यक्षाचं भीषण अपघातात निधन; पक्षातील दिग्गज नेते निवासस्थानी दाखल, राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Youth Leader Vishant Tyagi Killed In Horrific Road Accident Near Hapur: मेरठजवळ हापूर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विशांत त्यागी यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Wrecked car after a fatal road accident near Hapur that claimed the lives of BJP youth leader Vishant Tyagi and two others.
Wrecked car after a fatal road accident near Hapur that claimed the lives of BJP youth leader Vishant Tyagi and two others.saam tv
Published On

लग्न समारंभातून मेरठला परतत असलेले भाजप युवा मोर्चाचे जागृती विहार मंडळाचे अध्यक्ष विशांत त्यागी यांच्यासह तीन तरुणांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मृत्यू सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Wrecked car after a fatal road accident near Hapur that claimed the lives of BJP youth leader Vishant Tyagi and two others.
७ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुवेंदू अधिकारींचा आमदारकीचा राजीनामा; राजकारणात खळबळ

अज्ञात वाहनाची जोरदार धडक

मेरठच्या मेडिकल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्तराखंड कॉलनीचे रहिवासी असलेले भाजपा युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष विशांत त्यागी हे त्यांचे मित्र लवी, ललित चव्हाण आणि मिथुन यांच्यासोबत स्याना परिसरातील एका गावात लग्न समारंभासाठी गेले होते. रात्री उशिरा सर्वजण कारने मेरठला परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हापूरजवळ असता एक अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

Wrecked car after a fatal road accident near Hapur that claimed the lives of BJP youth leader Vishant Tyagi and two others.
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल २९ खाती; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कोणती मिळाली खाती?

तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

या भीषण अपघातात भाजपा नेते विशांत त्यागी, स्याना येथील रहिवासी लवी आणि मेरठच्या मुरलीपुरा येथील रहिवासी मिथुन यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या ललित चौहान याला तातडीने मेरठच्या गढ रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. ललित चौहान आणि लवी हे मूळचे स्याना परिसरातील रहिवासी होते. ते गेल्या काही वर्षांपासून उत्तराखंड कॉलनी येथे राहून विशांत त्यागी यांच्यासोबत भागीदारीत 'नवजीवन हॉस्पिटल' चालवत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com