Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Nandurbar News : शहादा तालुक्यात वीज बिल भरले असतानाही महावितरणने खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला. ऑक्सिजन रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Nandurbar NewsSaam Tv
Published On
Summary
  • वीज बिल भरले असतानाही रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित

  • रुग्णांच्या जिवाला गंभीर धोका

  • रुग्णांना उघड्यावर उपचार व स्थलांतर करावे लागले

  • दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

सागर निकवाडे,साम प्रतिनिधी नंदुरबार

नंदुरबारमध्ये महावितरणच्या बेजबाबदार आणि आडमुठ्या धोरणामुळे शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. वीज बिल पूर्ण भरलेले असतानाही महावितरणने एका खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केल्याने रुग्णांचे हाल झाले असून, ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्ध रुग्णाची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे.

म्हसावद ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याने सध्या हे रुग्णालय राणीपूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परिसरातील ५० किलोमीटर अंतरात एकही मोठे शासकीय रुग्णालय नसल्याने नागरिक खाजगी डॉक्टरांवर अवलंबून आहेत. येथील एका खाजगी रुग्णालयाने वीज बिल भरूनही महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित केला.

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Mumbai Bellasis Bridge : मुंबईकरांसाठी खुशखबर! मुंबई सेंट्रलमधील 'तो' ब्रिज सोमवारी होणार खुला, वाहतूककोंडी होणार कमी

विजेअभावी रुग्णालयात अंधार पसरल्याने आणि उपकरणे बंद पडल्याने डॉक्टरांना रुग्णांना चक्क रस्त्यावर उघड्यावर आणून उपचार द्यावे लागले. ऑक्सिजन मशीन बंद पडल्याने गंभीर रुग्णांच्या जीवावर बेतली आहे. अखेर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अनेक रुग्णांना तातडीने शहादा येथील रुग्णालयात हलवावे लागले.

या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत असून, दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करत आहेत. आता यावर प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वीज बिल भरले असतानाही महावितरणने केलेली ही कारवाई अनाकलनीय आहे. यामुळे रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com