Nagar Panchayat bypoll result : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, एसआयआर (SIR) आणि ईव्हीएमच्या (EVM) मुद्यावरून देशाच्या राजकारणात सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. त्यातच उत्तर प्रदेशात झालेल्या बॅलेट पेपरवरील निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या बिठूर नगरपंचायत पोटनिवडणुकीत विरोधकांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात बॅलट पेपरवर झालेल्या नगरपंचायत पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत समाजवादी पक्षाचा (सपा) दारूण पराभव केला आहे.
आगामी विधानसभा आणि सध्या सुरू असलेल्या विधान परिषद (MLC) निवडणुकीच्या धामधुमीत या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. कानपूरमधील बिठूर नगर पंचायत अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत कोणत्याही ईव्हीएमचा वापर न करता संपूर्ण मतदान बॅलट पेपरद्वारे पार पडले होते.
भाजप आमदाराच्या भावाचा एकतर्फी विजय
या निवडणुकीत भाजपचे आमदार अभिजित सिंह सांगा यांचे बंधू राणा समरेंद्र सिंह यांनी समाजवादी पक्ष समर्थित उमेदवार आदर्श द्विवेदी यांचा २,४८३ मतांच्या फरकाने धुव्वा उडवला. १३ ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान पार पडले होते. १५ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच भाजपचे राणा समरेंद्र सिंह यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.
काँग्रेसचा दारूण पराभव -
भाजप उमेदवार राणा समरेंद्र सिंह यांना ४,२१० मते मिळाली. सपाचा पाठिंबा असणारे उमेदवार आदर्श द्विवेदी यांना फक्त १,७२७ मते मिळाली. तर या निकालामध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या उमेदवाराला अवघी ५८ मते मिळवता आली. ईव्हीएमच्या मुद्यावरून देशभरात वातावरण तापले असताना, बॅलट पेपरवर झालेल्या निवडणुकीतही भाजपच्या उमेदवाराने मिळवलेला हा एकतर्फी विजय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.