

लागोपाठ ४ दिवसांच्या घरसणीनंतर आज सोन्याचे दर स्थिर झाले आहेत. सराफा बाजार उघडताच सोनं चांदी पुन्हा स्वस्त होईल, अशी आस ग्राहकांना लागली होती. पण दरांमध्ये कोणताही बदल झाला नाही. goodreturns संकेतस्थळानुसार, सोन्याच्या किंमती आज स्थिर आहेत.
२४ कॅरेट सोनं प्रति ग्रॅम ₹१४,७४४ रूपयांना मिळेल. तर प्रति तोळा किंमत ₹१,४७,४४० वर पोहोचली आहे. आठवड्याच्या सुरूवातीपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाली होती. या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील स्थानिक कर आणि दरांची खात्री करून घेणे सोयीचे ठरेल.
भारतामध्ये आज सोन्याच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. २४ कॅरेट सोनं प्रति १ ग्राम १४,७४४ रुपये आहे. तर १० ग्राम सोन्यासाठी १,४७,४४० रुपये मोजावे लागतील. १०० तोळं सोन्यासाठी १४,७४,४०० रुपये मोजावे लागत आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रामसाठी १,३५,१५० रुपये द्यावे लागतील. तर १०० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा दर १३,५१,५०० रुपये इतका आहे. याशिवाय, १८ कॅरेट सोन्याच्या दरातही बदल झालेला नाही. १ ग्राम सोन्याची किंमत ११,०५८ रुपये आहे. १० ग्राम सोन्याचा दर १,१०,५८० रुपये आणि १०० ग्राम १८ कॅरेट सोन्याचा दर ११,०५,८०० रुपये आहे.
मागील ५ दिवसात सोनं कोणत्या दिवशी किती स्वस्त झालं?
भारतातील सोन्याच्या दरांमध्ये मागील काही दिवसांत सलग घसरण पाहायला मिळाली आहे. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम १४,९६८ रुपये होता, ज्यामध्ये आदल्या दिवशीच्या तुलनेत १७४ रुपयांची मोठी घट झाली होती. याच दिवशी २२ कॅरेट सोन्याचा भाव १६० रुपयांनी घसरून प्रति ग्राम १३,७२० रुपयांवर आला होता.
घसरणीची ही मालिका १३ ऑक्टोबर रोजीही चालूच राहिली. या दिवशी २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३९ रुपयांची घसरण होऊन तो १४,९२९ रुपयांवर पोहोचला, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ३५ रुपयांनी कमी होऊन १३,६८५ रुपयांवर आला. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोने १०३ रुपयांनी स्वस्त होऊन प्रति ग्राम १४,८२६ रुपये झाले, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ९५ रुपयांनी घसरून प्रति ग्राम १३,५९० रुपयांवर स्थिरावली. १५ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा कपात नोंदवली गेली, ज्यामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ८२ रुपयांनी घसरून १४,७४४ रुपयांवर आला आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ७५ रुपयांनी घसरून १३,५१५ रुपयांवर पोहोचला. या सततच्या घसरणीनंतर, आज सोन्याच्या दरामध्ये कोणतीही नवीन वाढ किंवा घट झालेली नाही, म्हणजेच दर स्थिर राहिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.