विनायक वंजारी | साम टीव्ही प्रतिनिधी
Sachin Dhuri arrested for alleged comment on Nilesh Rane : कुडाळ-मालवणचे भाजप आमदार निलेश राणे यांच्यावर सोशल मीडियावरून आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे.
सचिन धुरी असे शाखाप्रमुखाचे नाव आहे. ते कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील ठाकरे सेनेचे शाखाप्रमुख आहेत. सचिन धुरी याने यापूर्वीही निलेश राणेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता; त्यावेळी पोलिसांकडून समज देण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका डिजिटल वृत्तवाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर आमदार निलेश राणे यांच्याशी संबंधित वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या बातमीच्या कमेंट सेक्शनमध्ये “sachindhuri84” या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली. ही कमेंट पाहताच महायुतीचे कार्यकर्ते व शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. संबंधित अकाऊंटधारकावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलिसांत केली.
तसेच युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, तालुकाप्रमुख सागर वालावलकर, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, संदेश सुकळवाडकर आणि कुमार राठोड यांनी संबंधित शाखाप्रमुखाचे घर गाठून त्याला जाब विचारला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत अखेर कुडाळ पोलिसांनी संबंधित शाखाप्रमुखाला रात्री उशिरा त्याच्या राहत्या घरातून अटक केली.
या वेळी तालुकाप्रमुख विनायक राणे, शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, कुडाळ तालुका संघटक रोहित भोगटे, चेतन पडते, राजवीर पाटील, प्रसन्ना गंगावणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.