आणखी एका राज्यात भाजपचा मुख्यमंत्री, आठवडाभरातच शपथविधी, वाचा पडद्यामागे नेमकं काय सुरू?

Political Changes In Bihar After Nitish Kumar Delhi Visit: बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. नितीश कुमार यांच्या हालचालींनंतर भाजपला पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
Bihar braces for a historic political shift as BJP prepares to appoint its first Chief Minister in the state.
Bihar braces for a historic political shift as BJP prepares to appoint its first Chief Minister in the state.Saam Tv
Published On

मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी दिल्लीमध्ये दाखल झाल्याने बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नितीश कुमार हे शुक्रवारी राज्यसभेमध्ये खासदारकीची शपथ घेणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने देखील दिल्लीत महत्वाची बैठक बोलावली असून यामध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावार शिक्कामोर्तब होणार आहे. 14 किंवा 15 एप्रिल रोजी पाटणा येथे गांधी मैदानात हा शपथविधी सोहळा होणार असल्याने हे मैदान रिकामे ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे.

Bihar braces for a historic political shift as BJP prepares to appoint its first Chief Minister in the state.
IAS transfers : महाराष्ट्राच्या प्रशासनात 'बदली' वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

बिहारच्या राजकारणात हा ऐतिहासिक क्षण ठरणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील पाटणामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पहिल्यांदाच आपला पक्षाचा मुख्यमंत्री मिळणार आहे. बुधवारी झालेल्या JDU च्या बैठकीत घोषणा केली की बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री राहील.

Bihar braces for a historic political shift as BJP prepares to appoint its first Chief Minister in the state.
भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! राजकीय वर्तुळात शोककळा

बिहार राज्याची धुरा कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेणार असून यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे अंतिम निर्णय घेणार आहेत. भाजपच्या मुख्यमंत्री निवडीच्या हालचालीमुळे बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदारांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहेत. बिहारमध्ये भाजपचे 89 आमदार असल्याने यामध्ये कोणाला संधी मिळते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com