भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; पक्षाच्या झेंड्यात लपेटून अखेरचा निरोप, राजकीय वर्तुळात शोककळा

Dharampal Singh Gets Final Farewell Wrapped In BJP Flag: उत्तर प्रदेशातील देवरिया येथे भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष धर्मपाल सिंह यांचे निधन झाले. भाजप नेते डॉ. शलभ मणि त्रिपाठी यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण करत पक्षाच्या झेंड्यात लपेटून त्यांना अखेरचा निरोप दिला.
BJP LEADER DHARAMPAL SINGH DIES IN UTTAR PRADESH
BJP LEADER DHARAMPAL SINGH DIES IN UTTAR PRADESHsaam tv
Published On: 

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बरवा गोस्थान येथील भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष, मागासवर्गीय मोर्चाचे अध्यक्ष आणि शक्तिकेंद्र संयोजक धर्मपाल सिंह यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप कार्यकर्त्यांसह परिसरात शोककळा पसरली. पक्षातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आमदार डॉ. शलभ मणि त्रिपाठी यांनी धर्मपाल सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पक्षाने एक सच्चा कार्यकर्ता गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंडळ प्रभारी नीरज शाही यांनीही पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

BJP LEADER DHARAMPAL SINGH DIES IN UTTAR PRADESH
Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

आमदार डॉ. शलभ मणि त्रिपाठी, धीरज शाही आणि संजय सिंह यांनी धर्मपाल सिंह यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज पांघरून त्यांना अखेरचा निरोप दिला. धर्मपाल सिंह यांनी भाजपमध्ये बूथ अध्यक्ष आणि शक्तिकेंद्र संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांनी योगदान दिले होते.

BJP LEADER DHARAMPAL SINGH DIES IN UTTAR PRADESH
CJP Protest: आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अडचणी वाढणार? ५ दिवस नाही तर २ ते ५ वर्षे होऊ शकतो तुरुंगवास, कायदेतज्ज्ञांनी काय सांगितलं?

यावेळी मंडळ अध्यक्ष राजन यादव, माजी मंडळ अध्यक्ष अरविंद चौहान, ब्लॉक प्रमुख पवन जायसवाल, भाजप नेते संजय सिंह, शैलेंद्र सिंह पन्नू, महामंत्री नवीन तिवारी, संजय प्रजापती, माजी महामंत्री भरत सिंह आणि प्रभूदत्त तिवारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com