Blue Drum Verdict Case : निळ्या ड्रममधील हत्याकांडप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय! मुस्कान आणि साहिलला सुनावली फाशीची शिक्षा!

Muskan And Sahil Blue Drum Verdict Case : उत्तर प्रदेशातील मेरठच्या चर्चित निळ्या ड्रम हत्याकांड प्रकरणात कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सौरभ राजपूत हत्या प्रकरणात आरोपी मुस्कान आणि साहिल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Meerut Blue Drum Murder Case The Saurabh Rajput murder case Muskan And Sahil Death
Meerut Blue Drum Murder Case The Saurabh Rajput murder case Muskan And Sahil Death AI Image
Published On: 

उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सगळ्यात चर्चेत असेलल्या निळा ड्रम हत्याकांडप्रकरणी कोर्टाने आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिलला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. घटनेनंतर एका वर्षाने या केसचा निकाल हाती आला असून मृत सौरभ राजपूतच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये मर्चंट नेव्हीचे माजी जवान सौरभ राजपूतची हत्या करण्यात आली. मात्र ही हत्या कोणी केली याबाबत गूढ होत. त्याच्या हत्येनंतर शरीराचे तुकडे करून एका निळ्या ड्रमामध्ये पुरण्यात आले. पोलीस चौकशीत ही हत्या सौरभच्या पत्नीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने केल्याचे उघडकीस आले.

Meerut Blue Drum Murder Case The Saurabh Rajput murder case Muskan And Sahil Death
Face Shaving : फेस शेविंगमुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस जाड येतात? डर्मेटोलॉजिस्ट काय सांगतात?

दरम्यान या प्रकरणी गेली १ वर्ष कोर्टात केस सुरु होती अखेर या केसचा अंतिम निकाल समोर आला आहे. या क्समधील आरोपी मुस्कान आणि तिच्या बॉयफ्रेंडला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com