

सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अटक
आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात दिल्ली पोलिसांची कारवाई
सीजेपी नेत्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले
आरोप सिद्ध झाल्यास आशुतोष रांका आणि सौरव दास यांची शिक्षा वाढू शकते
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सीजेपीचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास या दोघांना पोलिसांनी आज सकाळी अटक केली. जंतर-मंतरवर आंदोलन करण्यास दिल्ली पोलिसांनी बंदी घातली आहे. असे असताना देखील सीजेपीच्या दोन्ही नेत्यांनी जंतर-मंतरवर अनधिकृतपणे प्रवेश केला त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांच्याही कायदेशीर अडचणी वाढणार आहेत.
विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने सीजेपीच्या दोन्ही नेत्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांनाही तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते आणि दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमधील कलमांनुसार तुरुंगातील हे पाच दिवस फक्त सुरूवात आहे. जर न्यायालयामध्ये या दोघांवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना २ ते ५ वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते.
महत्वाचे म्हणजे, १२ ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरला अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळले. असे असताना देखील सौरव दास आणि आशुतोष रांका या दोघांनी बॅरिकेड्स तोडून जंतर-मंतरवर प्रवेश केला आणि राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास या दोघांना पोलिसांनी अटक करत त्यांना न्यायालयासमोर हजर केले. सध्या ते तिहार कारागृहात आहेत.
सीजेपीच्या दोन्ही नेत्यांना जंतर-मंतरवर आंदोलनासाठी जात असताना याआधी देखील अटक करण्यात आली होती. ११ ऑक्टोबर रोजी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन देण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला आणि खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांना सध्या तिहार कारागृहात ठेवण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.