CJP २ प्रमुख नेत्यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, दिल्लीचे वातावरण पुन्हा तापले

दिल्लीत CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर सीजेपी नेत्यांनी सरकारवर अधिकारांच्या गैरवापराचा आरोप केला आहे.

जंतरमंतर येथे विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी अटकेत असलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना न्यायालयाने ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जंतरमंतरवर जमावबंदी आणि प्रवेशास बंदी असतानाही विनापरवानगी आंदोलन करणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. याच प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. आज सकाळी दोन्ही नेत्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

दरम्यान, या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना CJP चे नेते अक्षय शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. "सरकारने आम्हाला तुरुंगात पाठवले तरी आम्ही अजिबात घाबरणार नाही," असे म्हणत त्यांनी सरकारविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

CJP नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पाच दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, CJP नेते अजिंक्य शिंदे यांनी मोदी सरकारवर अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. शिंदे यांनी दावा केला की, हे नेते CJP च्या स्वयंसेवकांसह जंतर-मंतरच्या दिशेने गेले होते, त्यांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आणि "भारत माता की जय" अशा घोषणा दिल्या. नागरिकांचे मूलभूत अधिकार दडपण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर व्यवस्थेचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. नेत्यांनी बंधपत्रातील (bond) अटींचे उल्लंघन केल्याचा पोलिसांचा दावाही शिंदे यांनी फेटाळून लावला. दुसरीकडे, पोलिसांनी न्यायालयात असा युक्तिवाद केल्याचे समजते की, या नेत्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे आणि ते पुन्हा तसाच गुन्हा करू शकतात. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान हे परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com