राज्यसभा निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र; उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?

Rajya Sabha Elections: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमधून रुक्मिणी मल्लिक, तर उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 16 ऑक्टोबरला 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
BJP Rajya Sabha candidate list 2026 latest news
BJP Rajya Sabha candidate list 2026 latest newssaam tv
Published On: 

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाने पश्चिम बंगालमधून रुक्मिणी मल्लिक, तर उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने दोन्ही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यसभेच्या 12 जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 10, उत्तराखंडमधील 1 आणि पश्चिम बंगालमधील 1 जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे.

BJP Rajya Sabha candidate list 2026 latest news
Political News : निवडणुकीआधी विद्यमान आमदाराची हाकालपट्टी, या पक्षाने नेत्यावर का केली कारवाई?

राज्यसभेच्या या जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये सार्वधिक जागा उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशमधील 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमधील एका जागेसाठीही मतदान होईल. या दोन्ही राज्यातील विद्यमान राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला संपत आहे.

पश्चिम बंगालमधील जागेसाठी पोटनिवडणूक

पश्चिम बंगालमध्ये होणारी निवडणूक इतर जागापेक्षा वेगळी आहे. याठिकाणी राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपने रुक्मिणी मल्लिक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या निर्णयाकडे पश्चिम बंगालमधील पक्षाच्या राजकीय रणनीतीचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

BJP Rajya Sabha candidate list 2026 latest news
मोठी राजकीय घडामोड! राहुल गांधींची ताकद वाढली, भाजपविरोधातील लढ्यात आणखी एका पक्षाची साथ, नेमकं झालं काय?

उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना संधी

उत्तराखंडमधील एका राज्यसभा जागेसाठी भाजपने दिनेश आर्य यांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या उमेदवारीला मंजुरी दिली आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत असताना राज्यातील राजकीय हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com