Cabinet Expansion: मोदी सरकारमध्ये मोठा उलटफेर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा होणार विस्तार

Major Union Cabinet Expansion Expected Soon: केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता असून याबाबत हालचालींना वेग आला आहे. पंजाबमधील दोन प्रमुख नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते.
Major Union Cabinet Expansion Expected Soon
Prime Minister Narendra Modi chairs a key meeting as discussions over a possible Union Cabinet expansion gather pace.saam tv
Published On
Summary
  • मोदी सरकारमध्ये मोठ्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

  • पंजाब आणि उत्तर प्रदेशातील बड्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार

  • आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत.

अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होत आहे, आता या विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचं 'रिपोर्ट कार्ड' तपासण्यात आले आहे. त्यावरून याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. आगामी वर्षातील उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

Major Union Cabinet Expansion Expected Soon
Tamil Nadu Politics: राज्य सरकार तीन महिन्यात कोसळणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

या मंत्रिमंडळात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील बड्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आलंय. त्यामुळे पंजाबमधून भाजपला बळ देण्यासाठी दोन प्रमुख नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल अशी चर्चा सुरू आहे.

यामध्ये पहिले नाव भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ आणि दुसरे नाव आम आदमी पक्षातून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांचे असल्याचं सांगितलं जात आहे. तरुण चुघ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असल्याचं मानले जातात. ते पंजाबमधील अमृतसर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी एचआरमध्ये एमबीए केलंय.

Major Union Cabinet Expansion Expected Soon
अवघ्या काही तासातच बंडखोर आमदारांच्या गटात फूट; राज्यातील राजकारण फिरलं!

ते दीर्घकाळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून सध्या पक्षाचे सरचिटणीस आहेत. त्यांच्याकडे जम्मू आणि काश्मीर, तेलंगणा आणि लडाखमधील भाजपची जबाबदारी आहे. राज्य भाजप सचिव आणि राज्य भाजप प्रशिक्षण कक्षाचे प्रभारी म्हणून काम केलंय. १९९७ मध्ये, त्यांनी भाजप युवा शाखा, पंजाबचे राज्य अध्यक्ष आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य म्हणूनही काम केलंय.

राघव चढ्ढा यांचीही वर्णी लागणार?

'आप'मधून भाजपमध्ये आलेले खासदार राघव चड्ढा यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. चड्ढा त्यांच्यासह, हरभजन सिंग, संदीप पाठक, स्वाती मालीवाल आणि इतर अनेकांसह आम आदमी पक्षाचे सात राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com