भाजप नेत्याकडून सासऱ्यांची चाकूने सपासप वार करून हत्या; पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्याने उचलले भयानक पाऊल

BJP Leader Father In Law Killed Ghaziabad Modinagar Case Details: गाझियाबादच्या मोदीनगरमध्ये भाजप नेत्यावर सासऱ्यांची चाकूने हत्या केल्याचा आरोप. पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्यानंतर घडली धक्कादायक घटना. पोलिसांकडून तपास सुरू.
Police investigation underway after a man allegedly stabbed his father-in-law to death in Modinagar, Ghaziabad following a family dispute.
Police investigation underway after a man allegedly stabbed his father-in-law to death in Modinagar, Ghaziabad following a family dispute.saam tv
Published On

उत्तरप्रदेशमधील गाझियाबादच्या मोदीनगरमध्ये भाजप शहराध्यक्षांची सासऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनार सिंह (वय 65) यांची हत्या त्यांच्या स्वतःच्या जावयाने केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या पत्नीला देखील धक्का देऊन जावई फरार झाला आहे.

Police investigation underway after a man allegedly stabbed his father-in-law to death in Modinagar, Ghaziabad following a family dispute.
Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगरच्या फफराना रोड परिसरात राहणारे अनार सिंग हे मोदी रबर फॅक्टरीचे निवृत कर्मचारी होते. त्यांना तीन मुली आहेत. त्यातील मोनिका हिचे लग्न बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर येथील संदीप चौधरी याच्याशी झाले आहे. सध्या तो मोदीनगरमधील ब्रम्हपुरी भागात राहत होता.

Police investigation underway after a man allegedly stabbed his father-in-law to death in Modinagar, Ghaziabad following a family dispute.
Smart Meter : अचानक वीज बिल दुप्पट-तिप्पट, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना जोरदार 'शॉक', राज्यात संतापाचे वातावरण

मृत अनार सिंग यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, दाजी आणि बहीण मोनिका यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मोनिका माहेरी आली होती. गुरुवारी रात्री संदीप चौधरी घरी आला आणि झालेल्या वादानंतर त्याने वाडिलांवर हल्ला केला. वाचवण्यासाठी धावलेल्या बहिणालाही यामध्ये दुखापत झाली. गुरुवारी रात्री संदीप चौधरी पत्नीला समजवण्यासाठी सासरी आला होता. मात्र पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने तो संतापला आणि वाद घालायला सुरूवात केली, त्यावेळी सासऱ्यांनी त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. यावर संतापलेल्या संदीपने कमरेतून चाकू काढून अनार सिंग यांच्यावर सपासप चाकूने वार केला.

Police investigation underway after a man allegedly stabbed his father-in-law to death in Modinagar, Ghaziabad following a family dispute.
Maharashtra Politics: शरद पवार अन् काँग्रेसला मोठा धक्का; 15 बडे नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार; राज्यात टायगर एक्स्प्रेस सुसाट

शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान अनार सिंग यांचा मृत्यू झाला. मोनिका हिने 15 वर्षांपूर्वी संदीप प्रेमविवाह केला होता.पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com