Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

WhatsApp ticket : रेल्वेने प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या तिकीटांच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आता WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही.
Indian Railways
Indian Railwaysgoogle
Published On

जर तुम्ही रोज रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बऱ्याचदा आपण WhatsApp वर आलेले तिकीट दाखवून प्रवास करतो किंवा कधीकधी त्याचा स्क्रिनशॉट काढून आपण फोनमध्ये सेव्ह करतो आणि प्रवास करतो. मात्र भारतीय रेल्वेने अनारक्षित (Unreserved) तिकिटांसंदर्भात महत्त्वाचा नियम स्पष्ट केला आहे.

RailOne App च्या मदतीने बुक केलेल्या तिकिटांसाठी काही अटी लागू केलेल्या आहेत. या नियमांचं पालन केलं नाही तर प्रवाशांना दंड आणि इतर कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. तसेच रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार RailOne App वरून काढलेले अनारक्षित तिकीट फक्त ज्या नोंदणीकृत मोबाईल फोनवर आणि ज्या मोबाईल नंबरवरून बुक करण्यात आलं आहे. त्याच डिव्हाइसवर वैध मानलं जातं.

Indian Railways
Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

त्यामुळे तिकीट WhatsApp वर दुसऱ्या मोबाईलमध्ये पाठवणं, त्याचा स्क्रीनशॉट सेव्ह करून दाखवणं किंवा इतर कोणत्याही माध्यमातून शेअर केलेली प्रत दाखवणं प्रवाशांसाठी ग्राह्य धरलं जाईल.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, डिजिटल तिकिटाची पडताळणी फक्त मूळ नोंदणीकेल्या नंबरवरच केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासादरम्यान तिकीट बुक केलेला तोच मोबाईल नंबर सोबत ठेवणं गरजेचं आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाकडे आधारकार्ड किंवा वैध फोटो आयडी असणं सुद्धा बंधनकारक आहे.

Indian Railways
EPFO Pension Update: फक्त 10 वर्षे नोकरी केली तरी मिळेल महिन्याला पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा शासनाने मान्य केलेले अन्य ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. तिकीट तपासणीच्यावेळेस तिकीट तपासनीसाठी (TTE) नोंदणीकेलेला मोबाईलवर तिकीट आणि फोटो आयडी या दोन्हींची पडताळणी करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com