EPFO Pension Update: फक्त 10 वर्षे नोकरी केली तरी मिळेल महिन्याला पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Employees Pension Scheme 2026: EPFO च्या EPS योजनेनुसार १० वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर मासिक पेन्शन मिळते. पेन्शनची गणना, पात्रता, UAN ट्रान्सफर आणि महत्त्वाचे नियम जाणून घ्या.
EPFO Alert
EPFO Alertgoogle
Published On

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत येणाऱ्या कर्माचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने Employees' Pension Scheme (EPS) 2026 लागू केली असली तरी पेन्शन मिळण्याचे महत्त्वाचे नियम आधीसारखेच कायम ठेवले आहेत. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या मनातला संभ्रम दूर झाला आहे.

जर तुम्हाला रिटायरमेंटनंतर दर महिन्याला पेन्शन हवी असेल, तर किमान १० वर्षांची पेन्शनपात्र सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे. ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मासिक पेन्शन मिळायला सुरूवात होते. इच्छुक कर्मचारी ५० वर्षांनंतर कमी रकमेची अर्ली पेन्शनही घेऊ शकतात.

EPFO Alert
पावसाळ्यात लाईटभोवती फिरणारे कीटक होतील गायब! वापरा हे 8 सोपे घरगुती उपाय

EPFO पेन्शनची रक्कम ठरावीक सू्त्रानुसार ठरवली जाते. ÷ ७० या सूत्रानुसार मासिक पेन्शनची गणना केली जाते. बऱ्याचदा कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनपात्र वेतनाची मर्यादा १५००० रुपये धरली जाते.

उदाहरणार्थ, जर तुमचं पेन्शनपात्र वेतन १५००० रुपये असेल आणि तुम्ही १० वर्ष नोकरी केली असेल, तर तुम्हाला २१४३ रुपये महिन्याला पेन्शन मिळू शकते. २० वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ही रक्कम सुमारे ४२८६ रुपये होते. तर ३५ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना ७५०० रुपये महिन्याला पेन्शन मिळेल.

सध्या EPS अंतर्गत किमान १००० रुपयांची बेसिक पेन्शन ठरवण्यात आली आहे. ही रक्कम वाढवून ५००० ते ७५०० रुपये करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत असली तरी सरकारने अजुनही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

तर नोकरी बदलताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. UAN च्या मदतीने EPF आणि EPS खातं नवीन कंपनीत ट्रान्सफर करणं विसरू नका. १० वर्ष पूर्ण होण्याआधी EPS ची रक्कम काढल्याने तुमची पेन्शनपात्र सेवा खंडित होऊ शकते. त्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या मासिक पेन्शनवर परिणाम होण्याची शक्यता असते.

टीप: ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी आहे. पेन्शन किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

EPFO Alert
Diabetes Kidney Health : किडनी खराब होत असतानाही दिसत नाहीत ही लक्षणं! मधुमेहींनी आजपासूनच फॉलो करा या सवयी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com