SIP Calculator: फक्त ६००० च्या SIP मधून रिटायरमेंटनंतर महिन्याला ६ लाखांची कमाई? जाणून घ्या संपूर्ण कॅलक्युलेशन

Mutual Fund : महिन्याला फक्त ६००० ची Step-Up SIP ३० वर्षात तुम्हाला मालामाल करू शकते. SWP च्या मदतीने रिटायरमेंटनंतर दरमहा ६ लाखांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
SIP Calculator
SIP Calculatorgoogle
Published On

प्रत्येक व्यक्ती त्याच्या पगातला काही भाग भविष्यासाठी जमा करून ठेवतो. त्यासाठी गुंतवणूक हा पर्याय सगळेच सोयीस्कर असल्यामुळे निवडतात. पण जास्त परतावा कशातून मिळतो हे बऱ्याच जणांना माहित नसतं. तर तुम्हाला रिटायरमेंटनंतर आर्थिक अडचणींच्या वेळेस टेन्शन नको असेल, तर लहान वयापासून नियमित गुंतवणूक करायला सुरुवात करा.

तुम्ही योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या मदतीने मोठा निधी तयार करता येतो.यासाठी म्युच्युअल फंडातली SIP (Systematic Investment Plan) आणि रिटायरमेंटनंतर SWP (Systematic Withdrawal Plan) यांचा एकत्रित वापर फायदेशीर ठरू शकतो.

SIP Calculator
Next Solar Eclipse India: भारतात पुढचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी दिसणार? जाणून घ्या तारीख आणि महत्त्वाची माहिती

समजा एखादी व्यक्ती वयाच्या तिशीच महिन्याला 6,000 ची SIP सुरू करत असेल. त्यानंतर दरवर्षी गुंतवणुकीत 10 टक्क्यांनी वाढ म्हणजेच स्टेप-अप SIP करते आणि ही गुंतवणूक सलग 30 वर्षे सुरू ठेवली आहे. तर वर्षाला १५ टक्के परतावा निश्चित मिळाल्यावर रिटायमेंटच्या वेळी जवळपास 9 कोटींचा निधी तयार होऊ शकतो. पण हा परतावा ठरलेला नसतो, तो बाजारातल्या चढ-उतारावर अवलंबून असतो.

याउलट जर महिन्याला फक्त 6,000 चीच SIP 30 वर्ष कायम ठेवली आणि त्यात कोणतीच वाढ केली नाही, तर त्याच परताव्याच्या अंदाजानुसार 4.20 कोटींचा निधी तयार होऊ शकतो. त्यामुळे दरवर्षी थोडी गुंतवणूक वाढवल्यावर काही वर्षात मोठा फरक पडू शकतो.

निवृत्तीनंतर हा निधी एकदम काढण्याऐवजी SWP च्या माध्यमातून महिन्याला ठराविक रक्कम घेता येते. उदाहरणार्थ, 9 कोटींच्या निधीवर 7 टक्के वार्षिक परताव्याचा अंदाज धरून 25 वर्षांसाठी दरमहा सुमारे 6 लाख मिळू शकतात. तसेच या कालावधीनंतरही निधीचा काही भाग शिल्लक राहण्याची शक्यता असते.

पण हे संपूर्ण गणित अंदाजाच्या परताव्यावर आधारित आहे. म्युच्युअल फंडातली गुंतवणूक बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असल्यामुळे परतावा कमी किंवा जास्त असू शकतो. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

SIP Calculator
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8वा वेतन आयोग लागू झाल्यास किती वाढेल पगार? फिटमेंट फॅक्टर, DA चा संपूर्ण हिशेब जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com