8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! 8वा वेतन आयोग लागू झाल्यास किती वाढेल पगार? फिटमेंट फॅक्टर, DA चा संपूर्ण हिशेब जाणून घ्या

Salary Hike: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता आणि संभ्याव्य पगारवाढीबाबत सुरु असलेल्या चर्चेसह सरकारची अधिकृत भूमिका आणि ताजी माहिती जाणून घ्या.
8th Pay Commission latest update
8th Pay Commission latest updategoogle
Published On

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशींनंतर पगारात किती वाढ होणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि महागाई भत्त्या (DA) कशा पद्धतीने समाविष्ट केला जाणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये फिरणाऱ्या आकड्यांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्र सरकारने १६ जानेवारी २०२५ रोजी मंजुरी दिली होती. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल घोषणा सुद्धा केली होती. त्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची सॅलरी, विविध भत्ते आणि पेन्शन यांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. या निर्णयाचा लाभ जवळपास ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना मिळण्याची अपेक्षा आहे.

8th Pay Commission latest update
Railway Passenger Rules : रेल्वे प्रवाशांनो सावधान ! हे 6 नियम मोडताच भरावा लागणार 500 रुपयांचा दंड

त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची अधिकृत स्थापना केली गेली. पुढे आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. सध्या विविध कर्मचारी संघटना, सरकारी विभाग आणि संबंधित घटकांकडून सूचना व मत मागवत आहे.

फिटमेंट फॅक्टर हा कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवाढीचा महत्त्वाचा भाग असतो. सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. आठव्या वेतन आयोगात २.१० , २.५७ किंवा त्याहून जास्त फिटमेंट फॅक्टर लागू होण्याची शक्यता आहे. अशा चर्चावर सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहेत. पण याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा आयोगाने केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा.

8th Pay Commission latest update
Nariman Point Cuffe Parade: नरिमन पॉईंट ते कफ परेडचा प्रवास होणार काही मिनिटांत; मंत्रालय परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com