पावसाळ्यात लाईटभोवती फिरणारे कीटक होतील गायब! वापरा हे 8 सोपे घरगुती उपाय

Sakshi Sunil Jadhav

पावळ्यातल्या समस्या

पावसाळ्यात संध्याकाळी लाईट लावताच लहान किटक आणि पतंग मोठ्या प्रमाणात जमा होतात. त्यामुळे बाल्कनी किंवा घराबाहेर बसणं अनेकदा त्रासदायक ठरतं.

insects around lights

मोहरीच्या तेलाचा उपाय

एका प्लास्टिकच्या पिशवीर थोडं मोहरीचं तेल लावा. मग ती पिशवी गरम बल्बला स्पर्श होणाक नाही पद्धतीने होल्डरजवळ बांधा.

bugs near light

सोपा उपाय

मोहरीच्या तेलाचा तीव्र वास अनेक किड्यांना दूर ठेवण्यास मदत करतो. काही किडे तेल लावलेल्या पृष्टभागावर चिकटूनही राहतात.

flying insects

पाण्याचा सोपा उपाय

लाईटच्या खाली रुंद ताट किंवा भांड्यात पाणी भरून ठेवा. उडणारे किडे पाण्यात पडतात, त्यामुळे आजूबाजूला घाण कमी होते.

moth control

कडुनिंबाच्या तेलाचा स्प्रे

पाण्यात २-३ चमचे कडुनिंबाचे तेल आणि थोडे लिक्विड डिशवॉश मिसळा. हे मिश्रण खिडक्या, दरवाजे आणि बाल्कनीजवळ फवारा.

home remedies for insects

कडुनिंबाच्या तेलाचा दिवा

संध्याकाळी तुमच्या गॅलरीत कडुलिंबाच्या तेलाचा दिवा लागू शकता. याच्या वासामुळे किड्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते.

monsoon pest control

गरजेनुसार निर्णय घ्या

गरज नसतील तर बाहेरचे दिवे सुरू ठेवू नका. यामुळे प्रकाशाकडे आकर्षित होणारे किडे होतील.

mosquito prevention

घराची स्वच्छता ठेवा

घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका आणि परिसर स्वच्छ ठेवा. यामुळे किड्यांची पैदास होण्याची शक्यता कमी होते.

neem oil spray

जाळी लावा

खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावल्यास किडे घरात येत नाहीत. हा उपाय पावसाळ्यात जास्त फायदेशीर ठरू शकतो.

window mesh

टीप

हे घरगुती उपाय सामान्य माहितीसाठी आहेत. किड्यांचा त्रास खूप वाढल्यास किंवा आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

monsoon cleaning tips

NEXT: White Hair: केस पांढरे होण्यामागे फक्त वय नाही! हे 5 आजारही असू शकतात कारण

vitamin B12 deficiency
येथे क्लिक करा