White Hair: केस पांढरे होण्यामागे फक्त वय नाही! हे 5 आजारही असू शकतात कारण

Sakshi Sunil Jadhav

केसांच्या समस्या

सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत केस पाढंरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. तुम्ही यामागचे कारण वेळीच ओळखणं गरजेचं आहे.

grey hair causes

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर केस पांढरे होऊ शकतात. यासोबत थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याची समस्या दिसू शकते.

grey hair causes | google

थायरॉइडचा त्रास

थायरॉइडचा हार्मोन्समध्ये बिघाड झाल्यास केस गळायला सुरुवात होते. यामुळे कमी वयात केस पांढरे होण्याची शक्यता वाढते.

white hair in young age

आयरनची कमतरता (Iron)

रक्तात लोह कमी असेल तर अॅनिमियाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळत नाही आणि ते पांढरे व्हायला लागतात.

vitamin B12 deficiency

पांढरे डाग

व्हिटिलिगो हा त्वचेचा आजार डोक्याच्या त्वचेवर झाला तर परिणाम केसांवरही होतो. त्या भागातले केस पूर्णपणे पांढरे होऊ शकतात.

thyroid and hair loss

सततचा मानसिक ताण

जास्त स्ट्रेसमुळे केसांचा नैसर्गिक रंग कमी होतो. त्यामुळे केस कमी वयातच पांढरे व्हायला सुरू होतात.

anemia and hair health

खराब आहार

पोषणयुक्त आहार न घेतल्याने शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता होते. याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर दिसून येतो.

stress and grey hair

लक्षात ठेवा

अचानक मोठ्या प्रमाणात केस पांढरे किंवा जास्त गळत असतील तर हे गंभीर असू शकतं. सोबत वजनात बदल आणि थकवा दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

unhealthy diet hair problems,

टीप

ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणतेही औषध किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

unhealthy diet hair problems,

NEXT : किडनी खराब होत असतानाही दिसत नाहीत ही लक्षणं! मधुमेहींनी आजपासूनच फॉलो करा या सवयी

diabetes lifestyle
येथे क्लिक करा