भाजप नेत्यालाच त्यांच्याच फार्महाऊसवर बंधक बनवून चोरठ्यांनी ५० लाख रूपयांची लूट केली. ही धक्कादायक घटना कानपूरमध्ये घडली. येथील वरिष्ठ नेते रमेश यादव यांना प्रमोशन मिळाले होते. त्यांना दिवसभर अभिनंदन आणि शुभेच्छांचे मेसेज येत होते. पण रात्री फार्महाऊसवर त्यांनाच चोरट्यांनी बंधक बनवून ५० लाखांची लूट केली. घटनेनंतर कानपूर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
यादव यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभिनंदनाचे मेसेज येत होते. पण मध्यरात्रीत त्यांच्याकडील लाखो रुपयांची लूट झाली. रमेश यादव यांची भाजपच्या मागासवर्गीय आघाडीतर्फे नवनियुक्त राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. ही जबाबदारी स्वीकारून लखनौहून परतल्यानंतर मध्यरात्री अज्ञात लोक फार्महाऊसमध्ये घुसले. यादव यांचे हातपाय बांधले आणि त्यांना ओलीस ठेवले. त्यांच्याकडून ५० लाख रुपये लुटण्यात आले. या घटनेनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश यादव यांचे फार्महाऊस शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर होते.
१ ऑक्टोबर हा दिवस कानपूरचे भाजप नेते रमेश यादव यांच्याकाठी अत्यंत खास होता. नुकतीच त्यांची भाजपच्या मागासवर्गीय आघाडीतर्फे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी सोमवारीच लखनौमध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता आणि सायंकाळी उशिरा ते कानपूरला परतले. दिवसभराच्या धावपळीनंतर ते शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या फार्महाऊसवर विश्रांती घेत होते. मात्र, मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले.
एखाद्या चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे काही मास्क घातलेले गुन्हेगार मध्यरात्री फार्महाऊसमध्ये शिरले. त्यांनी पूर्ण तयारीने येऊन सर्वप्रथम रमेश यादव यांना ताब्यात घेतले आणि त्यांचे हातपाय बांधून ओलीस (बंधक) ठेवले. यानंतर गुन्हेगारांनी संपूर्ण घरात धुमाकूळ घालत जवळपास ५० लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान वस्तू लांबवल्या. घराबाहेर उभे असलेल्या सुरक्षारक्षकालाही आत काय चालले आहे, याची कोणतीच कल्पना नव्हती.
रमेश यादव हे परिसरातील एक प्रभावशाली ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी यापूर्वी तीन वेळा ‘ब्लॉक प्रमुख’ म्हणून काम पाहिले असून, त्यांच्या पत्नी शशी यांनीही याच पदाची जबाबदारी सांभाळली आहे. २०२२ ची विधानसभा निवडणूक त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या (बसप) तिकिटावर बिठूर मतदारसंघातून लढवली होती. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षाने त्यांना राज्यमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली होती.
सत्ताधारी पक्षाच्या एका प्रमुख नेत्याच्या घरीच अशा प्रकारे दरोडा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त डॉ. विपिन टाडा, डीसीपी दक्षिण दीपेंद्रनाथ चौधरी यांच्यासह मोठा पोलीस फाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपास सुरू केला असून, गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.