Political News: भाजप पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पक्षातील अंतर्गत वादानंतर घडली भयंकर घटना

BJP Leader Death: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. भरचौकात १० जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
Political News: भाजप पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पक्षातील अंतर्गत वादानंतर घडली भयंकर घटना
BJP Leader DeathSaam Tv
Published On: 
  • पश्चिम बंगालमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

  • भरचौकात १० जणांनी काठी अन् लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

  • पश्चिम बंगालच्या मेदिनीपूरमध्ये घडली घटना

  • पक्षातील अंतर्गत वादातून भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

पश्चिम बंगालमध्ये भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. ८ ते १० जणांनी भरचोकात लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी मारहाण करत जागीच संपवलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहेत. पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर येथे ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याला मेदिनीपूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी मेदिनीपूर ग्रामीण भागातील हाथीहलकर येथे घडली. भाजपमधील अंतर्गत गटबाजीच्या वादातून ही घटना घडली. पक्षातील जुने आणि नवीन सदस्य यांच्यात वाद आहे. शमशेर आणि इतर अनेकांवर दुसऱ्या गटाच्या सदस्यांनी हल्ला केला. जिल्हा भाजप अध्यक्ष सौमेन तिवारी यांनी सांगितले की, नेमके काय घडले याचा तपास सुरू आहे. अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Political News: भाजप पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पक्षातील अंतर्गत वादानंतर घडली भयंकर घटना
BJP MLA : ४,००० कोटींची संपत्ती, पण भाजप आमदाराने मागितली भीक; मिळाले फक्त ८४ रुपये, राज्यात चर्चा

या वर्षी मे महिन्यात पश्चिम बंगालमधील न्यूटाऊन येथे एका भाजप कार्यकर्त्याला घेरून त्याची हत्या करण्यात आली होती . भाजपच्या विजयानंतर मधु मंडल नावाचा एक भाजप कार्यकर्ता आपल्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर पक्षाचा झेंडा फडकवत होता. झेंड्यावरून त्याचा कमल नावाच्या टीएमसी कार्यकर्त्यासोबत वाद झाला होता. दोघांमध्ये जोरदार वादविवाद झाल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले.

Political News: भाजप पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पक्षातील अंतर्गत वादानंतर घडली भयंकर घटना
BJP Leader: भाजप नेत्याच्या ताफ्यावर हल्ला, दगड-अंडी फेकल्याचा आरोप; राजकारणात खळबळ

त्यानंतर मधू मंडल यांना फोन करून त्याच ठिकाणी परत बोलावण्यात आले. त्यानंतर काही स्थानिक टीएमसी सदस्यांनी मधू मंडल यांना घेरले आणि त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेनंतर परिसरातील वातावरण तापले होते. आरोपींविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती.

Political News: भाजप पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पक्षातील अंतर्गत वादानंतर घडली भयंकर घटना
BJP Prabhari list: भाजपने भाकरी फिरवली! पक्षात मोठा फेरबदल; महाराष्ट्रातील ४ नेत्यांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com