BJP MLA : ४,००० कोटींची संपत्ती, पण भाजप आमदाराने मागितली भीक; मिळाले फक्त ८४ रुपये, राज्यात चर्चा

BJP MLA Parag Shah : भाजप आमदार पराग शाह यांनी मुंबईच्या रस्त्यावर चार तास भिकारी बनून भीक मागितली. तब्बल ४ हजार कोटींची संपत्ती असलेल्या पराग शाह यांच्या हातात या अनुभवातून फक्त ८४ रुपये जमा झाले.
BJP MLA Parag Shah
BJP MLA Parag Shah
Published On

Parag Shah ₹4000 crore wealth begging for four hours : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळखले जाणारे घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह सध्या एका वेगळ्याच आणि अनोख्या प्रसंगामुळे राज्यभरात चर्चेत आले आहेत. तब्बल ४ हजार कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक असतानाही त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर उतरून चक्क चार तास भीक मागितली. या चार तासांच्या भिकेतून त्यांच्या हातात केवळ ८४ रुपये जमा झाले आणि त्यांनी या पैशांतूनच जेवणही केले.

नेमका काय आहे प्रकार?

आमदार पराग शाह यांनी स्वतः या अनुभवाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे जैन गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज यांच्या सांगण्यावरून त्यांनी एक दिवस भिकारी बनून आयुष्य अनुभवण्याचा निर्णय घेतला होता. या आध्यातत्मिक अनुभवातून आयुष्याचे आणि माणुसकीचे खरे धडे शिकणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

BJP MLA Parag Shah
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'लाडकी बहीण'सह या २५ योजनांसाठी सरकारचा मोठा निर्णय, पाहा यादी

रेल्वे स्टेशनवर बसून मागितली भीक

हा अनुभव सांगताना पराग शाह म्हणाले, "मी घरातून अगदी सामान्य कपड्यांमध्ये निघालो आणि भीक मागण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाऊन बसलो. सुरुवातीला पोलीस माझ्याकडे संशयाने पाहत होते. एका अज्ञात महिलेने मला स्वयंपाकाचे काही सामान (शिधा) दिले. मी ते एका पोलिसाकडे ठेवले आणि संध्याकाळी पुन्हा तेच सामान गोळा करून त्यातून जेवण केले."

BJP MLA Parag Shah
Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

४ तासांत जमा झाले फक्त ८४ रुपये

चार तास मुंबईच्या रस्त्यांवर आणि स्टेशनवर फिरून भीक मागितल्यानंतर लोकांकडून त्यांना एकूण ८४ रुपये मिळाले. "भिकारी म्हणून फिरताना मला जाणीव झाली की, आपण कोणतीही जात, धर्म, पद किंवा संपत्ती नसलेला एक अत्यंत सामान्य माणूस आहोत," असे त्यांनी नमूद केले.

मुंबई हे केवळ स्वप्नांचे नाही, तर माणुसकीचे शहर

आपला अनुभव सांगताना आमदार पराग शाह म्हणाले की, "आजच्या धावपळीच्या युगात आपण माणसाला त्याच्या संपत्ती आणि हुद्यावरून पारखतो. पण या अनुभवाने माझे डोळे उघडले. मुंबईतील अनेक सामान्य लोकांनी मी कोण आहे हे न ओळखताही मला मदतीचा हात पुढे केला. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली ही मदत म्हणजेच खरी माणुसकी आहे. मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नसून माणुसकीचे शहर आहे, हा धडा मी आयुष्यभर लक्षात ठेवीन."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com