राजकारणात खळबळ! भाजप खासदारावर गुन्हा दाखल, ८७ समर्थकांची FIR मध्ये नावं; नेमकं प्रकरण काय?

Mukesh Rajput FIR : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे भाजप खासदार मुकेश राजपूत यांच्यासह ८७ जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. मालमत्ता वाद, मारहाण, लूटमार आणि दंगलीच्या आरोपांप्रकरणी MP-MLA न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
Mukesh Rajput FIR in Kasganj property dispute
Mukesh Rajput FIR in Kasganj property disputeSaam TV Marathi
Published On

Mukesh Rajput FIR in Kasganj property dispute : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एका वादाप्रकरणी पोलिसांनी थेट फर्रुखाबादचे भाजप खासदार मुकेश राजपूत आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई केली आहे. सहावर पोलीस ठाण्यात खासदारांसह तब्बल ८७ जणांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १२ जणांची नावे तर ७५ अज्ञात लोकांचा समावेश आहे. aajtak ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जमिनीच्या वादातून सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांशी हुज्जत घालणे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीवरच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Mukesh Rajput FIR in Kasganj property dispute
Today's Horoscope: या ६ राशींसाठी आजचा दिवस ठरणार 'गोल्डन संडे'! कोणावर होणार पैशांचा पाऊस? पाहा १२ राशींचे भविष्य

फर्रुखाबादचे भाजप खासदार मुकेश राजपूत यांच्यासह ८७ जणांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MP-MLA न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल केलेल्या या गुन्ह्यात, मालमत्तेच्या वादातून झालेल्या मारहाण, दरोडा आणि दंगल यांसारखे गंभीर आरोप आहेत. या गुन्ह्यात खासदारांचे कुटुंबीय, सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचीही नावे आहेत.

Mukesh Rajput FIR in Kasganj property dispute
Rain : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, १३ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी ; हवामान खात्याने काय अंदाज दिला?

उत्तर प्रदेशातील कासगंज येथील सहवर पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका घटनेबाबत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण भाजप खासदार मुकेश राजपूत यांच्या बहिणीच्या (रीना) सासरच्या वादाशी संबंधित आहे. खासदारांच्या मेहुण्याने आरोप केला आहे की, मुकेश राजपूत यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत त्यांना घरातून बाहेर काढले. इतकेच नाही तर त्यांचे दुकान हडपण्याचा प्रयत्न केला. तसेच घर आणि दुकानावर ताबा मिळवण्यासाठी काही गुंड पाठवून मारहाण, तोडफोड, लूटमार आणि दंगल घडवली, असा गंभीर आरोपही खासदारांवर करण्यात आला आहे.

Mukesh Rajput FIR in Kasganj property dispute
Property Rights : वडिलांच्या संपत्तीवरून घरात भांडण? मृत्युपत्र आणि कायद्याचे 'हे' ३ नियम तुम्हाला माहित असायलाच हवेत

त्यांनी असाही दावा केलाय की, त्यांनी या घटनेची तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण कोणीही दखल घेतली नाही अथवा एफआयआर दाखल केला नाही. त्यामुळे MP-MLA न्यायालयात जावे लागले. आता, प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. सहावर पोलिसांनी मुकेश राजपूत यांच्यासह ३७ नामनिर्देशित आरोपी आणि ५० अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com