सर्वात मोठी बातमी! 42 आमदारांवर कारवाई होणार? उच्च न्यायालयानं बजावली नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

High Court Notice To 42 MLa : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी हाती आलीय. पाटणा उच्च न्यायालयाने बिहारच्या ४२ आमदारांना नोटीस बजावली आहे. यामुळे आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये तपशील पूर्ण न दिल्यानं न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
High Court Notice To 42 MLa :
Bihar legislators face possible disqualification for incorrect nomination formssaam tv
Published On
Summary
  • बिहारमधील 42 आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस

  • प्रतिज्ञापत्रातील अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीसंदर्भात कारवाई

  • आमदारकीवर गदा येण्याची शक्यता

बिहारच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी हाती आलीय. येथील ४२ नेत्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. पटना उच्च न्यायालयाने बिहार विधानसभेच्या ४२ आमदारांना नोटीस बजावली आहे. हे प्रकरण नामांकन दरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये तथ्ये लपवल्यामुळे उच्च न्यायालयानं आमदारांना नोटीस बजावलीय.

High Court Notice To 42 MLa :
Raj Thackeray Meets Eknath Shinde: २० मिनिटांच्या भेटीत ठरली मोठी राजकीय डील? एकनाथ शिंदेंच्या भेटीमागील 'राज'कारण आलं समोर

ज्या ४२ आमदारांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावलीय, त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातील काही रकान्यातील तपशील भरला नाहीये. तर काही आमदारांनी चुकीची माहिती दिली आहे. नियमानुसार सर्व मुद्द्यांची स्पष्ट माहिती विहित नमुन्यात देणे आवश्यक आहे, अशी माहिती पटना उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील शशी भूषण मंगलम यांनी याप्रकरणी माध्यमांना दिली आहे.

High Court Notice To 42 MLa :
Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

विशेष म्हणजे,प्रतिज्ञापत्रात सर्व माहिती दिली नसतानाही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे नामांकन वैध घोषित केले. या आधारावरून पराभूत उमेदवार आणि काही मतदारांनी याप्रकरणी न्यायालयात आव्हान दिले आहे.पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, प्रतिज्ञापत्रातील तपशील लपवणं. किंवा खोटी माहिती देणं गंभीर प्रकरण असून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जर प्रतिज्ञापत्रात आवश्यक असलेली माहिती पूर्णपणे दिली गेली नसेल किंवा काही रकाने रिकामे सोडले असतील तर नामांकनाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असेही म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे पालन करायला लावणे ही निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

High Court Notice To 42 MLa :
Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

या प्रकरणाची सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने संबंधित ४२ आमदारांना नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. न्यायालयाने त्यांना त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उपस्थित केलेल्या तथ्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. न्यायालय आता पुढील सुनावणीदरम्यान सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com