Rajya Sabha : विनोद तावडे खासदार होणार? भाजपकडून ५ नावाची चर्चा

Vinod Tawde chances for Rajya Sabha 2026 : विनोद तावडे यांना भारतीय जनता पक्ष कडून राज्यसभा उमेदवारी मिळणार का याची चर्चा. रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांचीही चर्चा.

Who will get RS ticket from BJP : देशातील ३७ रिक्त राज्यसभा जागांसाठी आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाली आहे. यामध्ये सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यसभेच्या जागांसाठी मतांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपकडून राज्यात कुणाला संधी मिळणार? या चर्चेने जोर धरला आहे. राज्यातून केंद्राच्या राजकारणात सक्रीय झालेले विनोद तावडे यांना खासदारकीचं गिफ्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून विनोद तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? की आणखी कुणाला संधी दिली जाणार? याबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झालीय. भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आयाराम नेत्यांना संधी न देता पक्षाशी दिर्घकाळ निष्ठा राखलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी असा सूर पक्षातून उमटत आहे. मागील काही वर्षांत बाहेरून आलेल्या नेत्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेत संधी देण्यात आल्याची नाराजी काही गटांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे यावेळी तरी निष्ठावंतांचा विचार व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे. राज्यसभेसाठी भाजपमधील काही नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com