चॉकलेटचं आमिष देऊन दुकानात बोलावलं; नराधमाकडून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ

bihar shocking news : नराधमाने ८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Bihar news
bihar shocking newsSaam tv
Published On
Summary

बिहटा शहरात घडली खळबळजनक घटना

८ वर्षीय मुलीवर दुकानात अत्याचार

२१ वर्षीय आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

बिहारची राजधानी पटनाजवळ असलेल्या बिहटा शहरात खळबळजनक घटना घडली आहे. बिहटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ८ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. अत्याचाराची घटना उघडकीस झाल्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली. २१ वर्षीय आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

बिहटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या २१ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. चॉकलेटचं आमिष देऊन तिला दुकानात बोलावलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीचं गावात चॉकलेटचं दुकान आहे.

पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर तिच्या आईने तातडीने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमावर तात्काळ गुन्हा नोंदवला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांचं विशेष पथक बारकाईने प्रकरण हाताळत आहे.

Bihar news
Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

पोलिसांनी सांगितलं की, 'एक महिला सांयकाळी बिहटा पोलीस स्टेशनला पोहोचली. तिने ८ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार दिली. चॉकलेटचं आमिष देऊन दुकानात बोलावलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bihar news
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

बिहटा पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. पीडित मुलीचं वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आरोपीवर पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com