

बिहार विधान परिषदेच्या आठ जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
या निवडणुकीत चार पदवीधर आणि चार शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.
बिहार विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, 'महाआघाडी'मधील जागावाटपाच वाद अजून मिटला नाहीये. काँग्रेसने पाच जागांसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, आरजेडीने यापैकी चार जागांवर आधीच आपले उमेदवार उभे केले आहेत. यामुळे काँग्रेस आणि आरजेडी आमनेसामने आलेत.
दरम्यान बिहार विधान परिषदेच्या या आठ जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर रोजी होईल आणि उमेदवार ९ ऑक्टोबरपर्यंत आपली नावे मागे घेऊ शकतील. या जागांवरील विद्यमान विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ हा १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे. यादरम्यान काँग्रेस आणि आरजेडीमध्ये जागावाटपावरून वाद सुरू झालाय.
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, दरभंगा शिक्षक मतदारसंघातून डॉ. मदन मोहन झा, कोसी पदवीधर मतदारसंघातून मनोज कुमार जैस्वाल, दरभंगा पदवीधर मतदारसंघातून रजनीकांत पाठक, पाटणा शिक्षक मतदारसंघातून डॉ. संजय यादव आणि पाटणा पदवीधर मतदारसंघातून डॉ. असदुल्ला खान यांना उमेदवारी देण्यात आलीय.
आरजेडी आणि काँग्रेस चार जागा लढवणार आहेत. आरजेडीने या जागांसाठी खालील उमेदवार उभे केले आहेत. डॉ. संजीव कुमार सिंग (पाटणा शिक्षक मतदारसंघ), दिलीप कुमार (पाटणा पदवीधर मतदारसंघ), नितेश कुमार (कोसी पदवीधर मतदारसंघ) आणि अनिल कुमार झा (दरभंगा पदवीधर मतदारसंघ) यांना उमेदवारी दिली आहे.
या उमेदवारांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि आरजेडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सुरू झाले आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी आरजेडीने काँग्रेसशी चर्चा करायला हवी होती. दरम्यान, आघाडीतील दोन भागीदारांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे, एनडीए (NDA) नेत्यांनीही 'महाआघाडी'वर निशाणा साधण्यास सुरुवात केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.