प्रशासनात मोठे फेरबदल! मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; १६ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Bihar IPS Officers Transfer List 2026: बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल करत मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी १६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
Bihar Chief Minister Samrat Choudhary initiates major IPS reshuffle to strengthen law and order in the state.
Bihar Chief Minister Samrat Choudhary initiates major IPS reshuffle to strengthen law and order in the state.saam tv
Published On

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून सम्राट चौधरी सातत्याने आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणि कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने आता १६ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. गृह विभागाने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

Bihar Chief Minister Samrat Choudhary initiates major IPS reshuffle to strengthen law and order in the state.
BJP CM: भारतात भाजपचे किती मुख्यमंत्री? एका क्लिकवर वाचा यादी

कोणाची कुठे झाली बदली?

विकास वैभव: राज्यातील चर्चित आयपीएस अधिकारी विकास वैभव यांच्याकडे आता मगध रेंजच्या आयजी (IG) पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नैयर हसनैन खान: आर्थिक गुन्हे शाखेतून (EOU) त्यांची बदली करून आता त्यांच्याकडे बिहार विशेष सशस्त्र पोलीस दलाची धुरा देण्यात आली आहे.

सुधांशु कुमार: राज्य गुन्हे अभिलेख ब्युरो आणि आधुनिकीकरण विभागाचे एडीजी सुधांशु कुमार आता एडीजी (कायदा व सुव्यवस्था) म्हणून काम पाहतील.

डॉ. अमित कुमार जैन: यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOU) एडीजी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आयपीएस अधिकारी परेश सक्सेना यांना नागरी सुरक्षा विभागातच पोलीस महासंचालक (DG) पदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर निर्मल कुमार आझाद यांना पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) बनवण्यात आले आहे.

Bihar Chief Minister Samrat Choudhary initiates major IPS reshuffle to strengthen law and order in the state.
Tamil Nadu Accident: पर्यटकांची कार दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

प्रशासकीय सुधारणांवर भर

एनडीए सरकारमध्ये मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आणि खातेवाटपानंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सर्व मंत्र्यांना प्रशासकीय सुधारणा आणि उत्तरदायित्वावर (Accountability) भर देण्याचे निर्देश दिले होते. मंत्र्यांनीही आपापल्या विभागात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Bihar Chief Minister Samrat Choudhary initiates major IPS reshuffle to strengthen law and order in the state.
मोठी बातमी! PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, ताफ्याच्या मार्गात सापडल्या जिलेटिनच्या कांड्या

'योगी मॉडेल'शी तुलना

बिहारमध्ये फोफावत असलेली गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि हिंसाचार यावरून विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि वाढवणे हे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे. राजकीय वर्तुळात सम्राट चौधरी यांच्या या कडक पावलांची तुलना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली जात आहे. "विकसित बिहार"चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारीवर कठोर प्रहार आणि जातीय सलोखा राखणे हे मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर असल्याचे या बदल्यांवरून दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com