

बिहार निवडणूक निकाल जाहीर झाला आहे
एनडीएने २०१० प्रमाणे ऐतिहासिक विजय मिळवला
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ५० जागाही पार करता आल्या नाहीत
आरजेडीच्या मतांमध्ये मोठी घट तर एनडीएच्या मतांमध्ये वाढ झाली
बिहार विधानसभा निवडणिकीचा निकालाचे चित्र थोड्यात वेळात स्पष्ट होईल. ट्रेंड आणि निकालामध्ये एनडीएला मोठा विजय मिळताना पाहायला मिळत आहे. २४३ विधानसभा जागांपैकी २०६ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर विरोधी पक्ष महाआघाडीचा पराभव झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाआघाडीला ५० च्या वर जागा ओलांडता आल्या नाहीत. २०२५ चा एनडीएचा विजय हा पुन्हा एकदा २०१० च्या विधानसभा निवडणूक निकालांची आठवण करून देताना दिसत आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाने फक्त उल्लेखनीय कामगिरी केली नाही तर विरोधकांना जोरदार झटका दिला.
२०१० मध्ये लालू प्रसाद यादव बिहारच्या राजकारणात सक्रीय होते. त्यावेळी तेजस्वी यादव यांना राजकारणात रस नव्हता. सध्या लालू प्रसाद यादव हे वय, आरोप आणि शिक्षेमुळे राजकारणापासून दूर आहेत. त्यांचा राजकीय सहभाग आता त्यांच्या निवासस्थानापुरताच मर्यादित राहिला आहे. सध्या तिकीट वाटपापासून ते राजकीय रणनीतीपर्यंत सर्वच गोष्टीमध्ये तेजस्वी यादव सक्रीय असल्याचे पाहायला मिळाले. काही सभा वगळता लालू प्रसाद यादव प्रचारापासून दूर होते. या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी तेजस्वी यादव यांनी घेतली होती. पण तरी देखील या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव यांचा एनडीएने पराभव केला. या निवडणूक निकालाने २०१० ची आठवण करून दिली.
२०१० च्या विधानसभा निवडणुवकीमध्ये नितीश कुमार यांचा जदयू अजूनही एनडीएचा भाग होता. त्या वेळी जागावाटपात जदयूने १४१ जागा लढवल्या होत्या. तर भाजपने १०२ जागा लढवल्या होत्या. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने १६८ जागा लढवल्या होत्या आणि रामविलास पासवान यांच्या लोजपाने ७५ जागा लढवल्या होत्या. तर राज्यातील सर्वच २४३ जागांवर काँग्रेसने उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीमध्ये महाआघाडी नव्हती. युती होती ती फक्त राजद आणि लोजप यांच्यात होती. रामविलास पासवान यांच्या लोजपाने लालू प्रसाद यादव यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला होता.
निवडणुकीच्या निकालांच्या बाबतीत, एनडीएने विक्रमी २०६ जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी आरजेडी, एलजेपी आणि काँग्रेसला फक्त २५ जागांवर यश मिळाले होते. जेडीयूने ११५ जागा जिंकल्या, तर भाजपने ९१ जागा जिंकल्या. दुसरीकडे, आरजेडीने २२ जागा, एलजेपीने ३ आणि काँग्रेसने ४ जागा जिंकल्या. इतर जागांमध्ये सीपीआयने १, आयएनडीने ६ आणि झामुमोने १ जागा जिंकली. अशापद्धतीने २०१० च्या निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर विरोधी पक्ष ५० च्या पुढेही जाऊ शकला नाही. यावेळीही अशीच संमिश्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाने २०१० ची आठावण करून दिली.
२००५ च्या निवडणुकीमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. २०१० मध्ये जेडीयूने २७ जागा जिंकल्या, तर भाजपने ३६ जागा जास्त जिंकल्या. दरम्यान, विरोधी पक्षाला ३२ जागा कमी पडल्या. जेडीयूच्या मतांच्या टक्केवारीत २.१२ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्याचप्रमाणे भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही ०.८४ टक्क्यांनी वाढ झाली. यावेळी आरजेडीने ४.३६ टक्के मते गमावली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.