Bihar Election Result: ...तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं, बिहार निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

Ambadas Danve: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस आणि भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसने स्वत:ची वृत्ती बदलली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
Bihar Election Result: ...तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं, बिहार निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
Ambadas Danve Saam Tv
Published On

Summary:

  • बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळाले

  • एनडीए २०० जागांवर आघाडीवर आहे

  • या निकालावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली

  • काँग्रेसने स्वत:ची वृत्ती बदलली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले

  • जागावाटपात नेहमी मोठा वाटा मागतात आणि निकालात मोठा पराभव होतो

माधव सावरगावे, संभाजीनगर

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळाले. एनडीए १९७ जागांवर आघाडीवर आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट काँग्रेसवर घणाघात केला. 'काँग्रेसने स्वत:ची वृत्ती बदलली पाहिजे. काँग्रेसने मोठ्या चुका केल्या आहेत. त्यांनी आपल्या पराभवातून शिकायला हवे.', असे स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. तसंच, त्यांनी यावेळी, 'महाराष्ट्रात निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले असते तर राज्याच चित्र वेगळे असते.', अशी देखील खंत त्यांनी व्यक्त केली.

माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालाबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपसोबत काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे. काँग्रेसने मोठ्या चुका केल्या असून त्यांनी आपल्या पराभवातून शिकायला हवे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असती. ती चुकी बिहारमध्ये केली. भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहे हे घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला.'

Bihar Election Result: ...तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं, बिहार निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
Bihar Election: बिहारमध्ये ऐन वेळी बदलते आकडे; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणारे तेजस्वी यादवांची केवळ 219 मतांची आघाडी|VIDEO

तसंच, 'काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या आहेत. मतदार यादीत घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटपमध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो. माझं मत स्पष्ट आहे. यामुळं मोठे नुकसान होते. बिहारचे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे. राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे. मात्र जागावाटप अखेरच्या दिवशीपर्यंत होत असेल तर गंभीर आहे. याचे परिणाम निकालावर होतो. महाराष्ट्रात निवडणूक वेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केले असते. जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते. जी चूक महाराष्ट्रमध्ये झाली तीच बिहारमध्ये झाली. त्यामुळे काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी.', असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.

Bihar Election Result: ...तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं, बिहार निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
Bihar Election Result : बिहारमध्ये सत्ता कुणाकडे? पहिला कौल भाजपच्या बाजूने, एनडीएची मोठी आघाडी

अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर आणि भाजपवर केलेल्या टीकेवर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अंबादास दानवे यांना उशिरा आलेले हे शहाणपण आहे.', असे मत भागवत कराड यांनी व्यक्त केले. तसंच, 'राज्यात उद्धव ठाकरे काय तर राहुल गांधीचा देखील चेहरा ठेवला असता तरी जनतेने हिंदुत्वाचा स्वीकार केला.', असे देखील भागवत कराड म्हणाले.

Bihar Election Result: ...तर महाराष्ट्रात चित्र वेगळं असतं, बिहार निकालावरून अंबादास दानवेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com