Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Bihar Election Result Date Counting Time: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज १४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू होईल. सर्वात प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी केली जाईल, त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी केली जाईल.
Bihar Election Result Date Counting Time
Bihar Election Result: मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त; ईव्हीएम आणि पोस्टल बॅलेट मोजणी सुरू
Published On
Summary
  • बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी

  • सर्वात प्रथम पोस्टल बॅलेटची मोजणी केल्यानंतर ईव्हीएम मतमोजणी

  • मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा

बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांसाठी मत मोजणी केली जाईल.निवडणूक आयोगाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. पारदर्शकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मतमोजणीच्या वेळी ४,३७२ टेबलावर ५ कोटी मतांची मतमोजणी केली जाईल.

बिहारमधील सर्व २४३ विधानसभा जागांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आलीय. प्रत्येक मतदारसंघासाठी एक निवडणूक अधिकारी आणि एक मतमोजणी निरीक्षक तैनात केले गेले आहेत. वाद झाल्यास ईव्हीएम मते व्हीव्हीपॅट स्लिपशी जुळवली जाणार आहेत. निवडणूक निकाल राउंड-वाइज आणि विधानसभे प्रमाणे संकलित केले जातील. त्यानंतर संबंधित आरओद्वारे निवडणूक आयोगाच्या अधिकृत निकाल पोर्टलवर अपलोड केले जातील.

Bihar Election Result Date Counting Time
Congress Leader: एक्झिट पोलनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, निवडणूक संपताच बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

ईव्हीएम मतांच्या मोजणीदरम्यान प्रत्येक नियंत्रण युनिट टेबलावर आणले जाईल. ते एजंट्सला दाखवले जातील जेणेकरून त्यांचा शिक्का आणि अनुक्रमांक त्यात नोंदवलेल्या तपशीलांशी जुळतो का ते तपासता येईल. जर कोणत्याही बूथमधील मतांच्या संख्येत किंवा नोंदींमध्ये तफावत आढळली तर त्या बूथच्या व्हीव्हीपॅट स्लिप अनिवार्यपणे मोजल्या जातील. प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक तैनात करण्यात आलेत.

Bihar Election Result Date Counting Time
Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

याशिवाय उमेदवारांनी नियुक्त केलेले १८,००० हून अधिक मतमोजणी एजंट मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहील. तर ईव्हीएमची मोजणी पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यादृच्छिकपणे ५ मतदान केंद्रे निवडली जातील, जिथे व्हीव्हीपॅट स्लिप ईव्हीएम निकालांशी जुळवल्या जातील

. हे काम उमेदवार आणि त्यांच्या एजंटांच्या उपस्थितीत केले जाईल. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. यावेळी, बिहारमधील मतदानाचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित ६७.१३ टक्के मतदान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com