

बिहार विधानसभा निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडली. या निवडणुकीचा निकाल उद्या १४ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मागील दोन दिवसांपासून या निवडणुकीबाबत अनेक पोल जाहीर झालेत. यात अनेकांनी एनडीए आणि महागठबंधन यांना मिळणाऱ्या जागांबाबत अनेक आकडे जाहीर केलेत. यातील बहुतेक संस्थांनी एनडीएची सत्ता बनणार असल्याचं सांगितलं.
दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीत २४३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात पहिल्या टप्प्यात १२१ तर दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर सत्ता बनवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे १२२ जागा जिंकलेल्या असणं आवश्यक आहे.
दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या पोलमध्ये एनडीएची सत्ता येणार असल्याचं दाखवण्यात आलंय. तर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय.
'मॅटराइझ'च्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला १४७-१६७, महाआघाडीला ७०-९० जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पी मार्क्यूने एनडीएला १४२-१६२ जागांवर विजय मिळेल, असे सांगितले. तर महाआघाडीला ८०-९८ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला १३३-१५९, महाआघाडीला ७५-१०१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. भास्करच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला १४५-१६०, महाआघाडीला ७३-९१ जागा मिळतील, पीपल्स इनसाइटच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बिहारमध्ये एनडीए सरकार येईल. त्यांना १३३-१४८ जागा, तर महाआघाडीला ८७-१०२ जागा मिळतील.
जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला १३५-१५० जागांवर विजय मिळेल. महाआघाडी ८८-१०३ जागा जिंकेल, असा अंदाज आहे. पोलस्ट्रेट एजन्सीनुसार, एनडीएला १३३-१४८, तर महाआघाडीला ८७-१०२ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
पोल डायरीचा एक्झिट पोल
एनडीए - १८४ ते २०९
महाआघाडी - ३२ ते ४९
अॅक्सिस माय इंडिया
एनडीए - १२१ - १४१
महाआघाडी - ९८-११८
टुडेज चाणक्य
एनडीए - १४८ ते १७२
महाआघाडी - ६५-८९ जागांवर विजय मिळण्याची शक्यता
व्होट वाइब -
एनडीए - १२५ ते १४५
महाआघाडी - ९५ ते ११५
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.