Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबरला लागणार आहे. निकालापूर्वी टुडे्ज चाणक्यचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...
Bihar Exit pollsSaam tv
Published On

Summary -

  • बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबरला लागणार

  • टुडे्ज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला १६० जागा मिळणार

  • महाआघाडीला ७७ तर इतरांना ६ जागा मिळण्याचा अंदाज

  • बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याची शक्यता

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून निकाल जाहीर होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निकाल लागण्यापूर्वी सर्वे एजन्सी टुडे्ज चाणक्य यांचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला २४३ पैकी १६० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला फक्त ७७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जन सूराज पार्टी, एआयएमआयएम आणि इतर पक्षांना ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...
Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

टुडे्ज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला जास्तीत जास्त ४४ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. तर महाआघाडीला फक्त ३८ टक्के मते मिळू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १८ टक्के मते इतर पक्षांच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलनुसार, यादव, दलित, ओबीसी, ईबीसी आणि इतर जातींमधून प्रत्येक आघाडीला किती मते मिळू शकतात याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...
एनडीए की महाआघाडी, बिहारमध्ये यंदा कुणाची सत्ता? एक्झिट पोलमधून धक्कादायक अंदाज समोर, VIDEO

टुडे्ज चाणक्य एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळणार?

एनडीए - १६० जागा

महाआघाडी -७७ जागा

इतर - ६ जागा

टुडे्ज चाणक्य एक्झिट पोलमध्ये कुणाला किती टक्के मतं मिळणार?

एनडीए - ४४ टक्के

महाआघाडी - ३८ टक्के

इतर - १८ टक्के

Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...
Bihar Exit Poll: भाजपच्या जागांमध्ये घसरगुंडी,नितीश कुमारांच्या JDUची सरशी; जाणून घ्या एक्झिट पोलचा अंदाज

एनडीए आणि महाआघाडीला कोणत्या जाती किंवा वर्गातून किती मते मिळण्याची शक्यता?

यादव यांच्या मतांची टक्केवारी -

एनडीए - २३ टक्के

महाआघाडी - ६७ टक्के

ओबीसी आणि ईबीसींचा मतांची टक्केवारी-

एनडीए - ५५ टक्के

महाआघाडी - २४ टक्के

अनुसूचित जातीच्या मतांची टक्केवारी -

एनडीए - ५८ टक्के

महाआघाडी - २६ टक्के

मुस्लिम मतांची टक्केवारी -

एनडीए - १२ टक्के

महाआघाडी - ६९ टक्के

Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...
Bihar Election 2025 Exit Poll: रणनितीकार प्रशांत किशोर किंगमेकर ठरणार? यश मिळेल की अपयश,कोणाला मिळणार बहुमत?

दरम्यान, २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत टुडेज चाणक्यने दिलेल्या एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला २४३ पैकी १८० जागा जिंकून विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला ५५ आणि इतरांना ८ जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता.

पण, २०२० च्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष निकाल उलटा लागला होता. एनडीएने १२५ जागांवर विजय मिळवला होता. तर महाआघाडीने ११० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीमध्ये टुडेज चाणक्यंचा एक्झिट पोल किती खरा ठरतोय ते १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतरच कळेल.

Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...
Bihar Exit Polls : भाजपला मोठा धक्का; बिहारमध्ये तेजस्वी यादव धोबीपछाड देणार, एक्झिट पोलचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com