Bihar Exit Polls : भाजपला मोठा धक्का; बिहारमध्ये तेजस्वी यादव धोबीपछाड देणार, एक्झिट पोलचा अंदाज

axix my india bihar exit polls : बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे बिहारमध्ये तेजस्वी यादव धोबीपछाड देणार असल्याचा नव्या संस्थेचा एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे.
bihar exit polls
axix my india bihar exit pollsSaam tv
Published On
Summary

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय

एक्सिस माय इंडियाच्या एग्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांना दिलासा

बिहारमध्ये आरजेडी ठरणार सर्वाधिक मोठा पक्ष

बिहार विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता बिहारमधील लोकांना विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीच्या निकालाआधी अनेक संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजात महाआघाडीला मोठा हादरा बसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आज जाहीर झालेल्या एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला मोठा दिलासा मिळाला आहे.

एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल अनुसार, एनडीएला बिहारच्या २४३ विधानसभा मतदारसंघातील १२१ ते १४१ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीला ९८ ते ११८ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीला दोन जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर आरजेडीला सर्वाधिक ६७-७६ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

bihar exit polls
Maharashtra Politics : महायुती फिस्कटली, पण नवीच आघाडी उदयास आली; बदलापूरचं राजकारण फिरलं

बिहारमध्ये जेडीयू दुसरा आणि भाजप तिसऱ्या क्रमाकांच्या जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीएला ४३ टक्के, महाआघाडी ४१ टक्के, इतर १२ टक्के आणि जन सुराज पक्षाला ४ टक्के मतदान मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव सर्वात आघाडीवर आहेत. तर नीतीश कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Bihar AXIS Exit Poll

आरजेडी : ६७-७६ जागा

जेडीयू : ५६-६२ जागा

भाजप : ५०-५६ जागा

काँग्रेस : १७-२१ जागा

लोक जनशक्ती पार्टी : ११-१६ जागा

bihar exit polls
परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी; बायकोचा आयएएस नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

बिहारमध्ये कुणाची सत्ता?

एनडीए : १२१-१४१ जागा

महाआघाडी : ९८-११८ जागा

जन सुराज पक्ष : ०-२ जागा

AIMIM : ०-२ जागा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com