

बिहार विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज समोर
बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
एक्झिट पोलच्या अंदाजाचा महाआघाडीला धक्का
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान आज मंगळवारी पार पडलं. त्यानंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. या निकालाआधीच निवडणुकीच्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या अंदाजातून बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एक्झिट पोलचे अंदाज हे महाआघाडीला धक्कादायक ठरले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा थेट तेजस्वी यादव आणि नीतीश कुमार यांच्यात थेट सामना होत आहे. तर दुसरीकडे जनसुराज यांचाही पक्ष मैदानात आहे. मतदानानंतर समोर आलेल्या एक्जिट पोलमधून एनडीएला मोठा दिलासा मिळाला आहे. आयएएनएस आणि मॅटराजइज एक्झिट पोलमधून एनडीएला १४७-१६७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाआघाडीला ७०-८९ जागा मिळण्याचा अंदाज समोर येत आहे.
पिपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार, एनडीए १३३-१५९ , महाआघाडी ७५-१०१, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला ०-५, इतर २-८ जागा मिळण्याची शक्यता आहे. IANS-MATRIZE एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एनडीएला १४७-१६७ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप ६५-७३, जेडीयू ६७-७५, एलजेपीआर ७-९, हम ४-५, आरएलएम १-२ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाआघाडीला ७०-८९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आरजेडी ५३-५८, काँग्रेस १०-१२, वीआयपी १-४, डावे गट ९-१४ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एकूण पाच वाजेपर्यंत ६७ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत ६५ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. त्यात महिलांनी पुरुषांपेक्षा अधिक मतदान केलं. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात १२१ विधानसभा जागांवर मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांवर मतदान झालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.