होळीच्या दिवशी रक्ताचा सडा; तीन मित्रांवर गोळ्या झाडल्या, दोघांचा जागीच मृत्यू

holi festival clash : बिहारमध्ये होळीच्या दिवशी रक्ताचा सडा सांडलाय. तीन मित्रांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील दोघांचा मृत्यू झाला.
bihar news update
bihar news Saam tv
Published On
Summary

होळीच्या दिवशी घडली गोळीबाराची धक्कादायक घटना

तीन मित्रांवर अज्ञातांकडून गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू

अजेश कुमार गंभीर जखमी

होळीच्या दिवशी रक्ताचा सडा सांडला आहे. बिहारच्या नवगछिया भागात भयंकर घटना घडली आहे. नवगाछियामध्ये बुधवारी रात्री तीन तरुणांवर गोळीबार झाल्याची घटना घडली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने पुढील उपाचारासाठी भागलपूरच्या मायागंज रुग्णालयातून पटना येथे हलविण्यात आलं आहे .

गुलशन कुमार आणि धीरज कुमार अशी गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. तर अजेश कुमार असे जखमी तरुणाचे नाव आहे. अजेशला मायागंज रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पटना येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. गोळीबाराची घटना घडल्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.

bihar news update
राज्यातील २ बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली; कुणाची कुठे बदली? वाचा सविस्तर

तिघेही मित्र होते. तिघे जण खगडिया जिल्ह्याच्या पसराहा पोलीस ठाण्यात हद्दीतील भौरकाठ गावात राहायला होते. मृत गुलशन कुमारचा भाऊ मिथलेश मंडलने सांगितले की, 'होळीच्या दिवश माझा भाऊ हा दोन मित्रांसोबत पत्नीला घेऊन सासरी गेला होता. पत्नीला सासरी सोडल्यानंतर तिघे मित्र बोरवा गावात गेले. ते सायंकाळी ४ वाजता घरातून निघाले. परंतु रात्री उशिरा देखील घरी परतले नाहीत'.

bihar news update
धाड धाड...! कुख्यात गुंडावर ७ गोळ्या झाडल्या, घटनास्थळी बघ्यांची गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांची शोधाशोध सुरू केली आहे. परंतु दोघेही सापडले नाहीत. काही वेळानंतर जखमी अजेश कुमारने नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ९ वाजता कलबलिया धारजवळील एका रस्त्याच्या किनाऱ्यावर दोघांचे मृतदेह सापडले. दोघांची गोळ्या झाडून हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु होळीच्या दिवशी झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com