Bihar Caste Census: बिहारमधील 'या' जाती आहेत आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक गरीब, किती टक्के लोकांकडे आहे सरकारी नोकरी

Bihar Caste Census: बिहारमधील कोणत्या जाती सर्वाधिक गरीब आहेत. कोणत्या जातींमधील लोकांकडे सरकारी नोकरी आहे. याची आकडेवारी जाहीर करण्यात आलीय.
Bihar Caste Census
Bihar Caste CensusSaam Tv
Published On

Bihar Caste Census:

बिहारमध्ये पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना केली गेली. बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या ६३ टक्के आहे. तर २७ टक्के लोकसंख्या मागास असून दलितांची लोकसंख्या १९ टक्के असल्याची आकडेवारी मुख्यमंत्री नितीश कुमारच्या सरकारने जाहीर केली होती. आता या जनगणनेचं आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या जातींची आकडेवारी जाहीर करण्यात आलीय. (Latest News)

साधारण गटातील सर्वाधिक गरीब लोक हे २५ टक्के आहेत. अहवालानुसार, बिहारमधील अनुसूचित जातीतील ४२ टक्के लोक गरीब आहेत. तर इतर मागासवर्गीय लोकांपैकी ३३.१६ टक्के आणि अत्यंत मागासवर्गातील ३३.५८ टक्के लोक गरीब असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज मंगळवारी बिहार राज्याच्या विधानसभेत या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आलाय. या अहवालानुसार, दर तीन कुटुंबामागील एक कुटुंब हे गरीब असून त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त ६ रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. गरीब जातींमध्ये हिंदू धर्मातील साधारण गटामधील ब्राह्मण समाज दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, २५.३२ टक्के ब्राह्मण कुटुंब हे गरिबीमध्ये आहेत. बिहारमध्ये ब्राह्मण जातीमध्ये एकूण १० लाख ७६ हजार ५६३ कुटुंबे आहेत. यातील २ लाख ७२ हजार ५७६ कुटुंबं हे गरीब आहेत.

तिसऱ्या नंबरवर राजपूत जातीमधील लोकं गरीब आहेत. राजपुतांमधील २४.८९ टक्के लोक हे गरीब आहेत. सरकारच्या अहवालानुसार, बिहारमध्ये ९ लाख ५३ हजार ४४७ टक्के लोकं हे राजपूत समाजाचे आहेत. यातील २ लाख ३७ हजार ४१२ कुटुंबं हे गरीब आहेत. तर कायस्थ जातीला सर्वाधिक संपन्न म्हटलं गेलं आहे. बिहारमध्ये १३.८५ टक्के लोक हे या जातीचे आहेत. कायस्थ समाजाची एकूण १ लाख ७०हजार ९८५ कुटुंबं आहेत. यातील २३ हजार ६३९ कुटुंब हे गरीब आहेत.

मुस्लीम धर्मातील कोणत्या जाती आहेत गरीब

बिहार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुस्लीम धर्मातील तीन जातींचा लेखा-जोख दिलाय. यात शेख, पठाण आणि सैयद या जातींचा समावेश आहे. मुस्लीम शेख जातीतील २५.८४ टक्के लोक गरीब आहेत. तर शेख जातीमध्ये १० लाख ३८ हजार ८८ कुटुंब आहेत. यातील २ लाख ६८ हजार ३९८ कुटुंबं गरीब आहेत. पठाण जातीमधील २२.२० टक्के कुटुंब गरीब आहेत. तर सैयद जातीमधील १७.६१ टक्के कुटुंब हे गरीब आहेत.

किती लोकांकडे आहे सरकारी नोकरी

बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातीनिहाय सर्व्हेनुसार, मागासवर्गातील ६ लाख २१ हजार ४८१ टक्के लोकांकडे सरकारी नोकरी आहे. नोकरी करणाऱ्यांची टक्केवारी १.७५ टक्के ही आहे. ही टक्केवारी एकूण समाजाच्या लोकसंख्येतून काढण्यात आलीय. तर यादव जातीमधील २ लाख ८९ हजार ५३८ लोकांना सरकारी नोकरी आहे. टक्केवारी संख्या मांडली तर १.५५ टक्के लोकांकडे सरकारी नोकरी आहे. तर कुशवाह जातीतील २.०४ टक्के लोकांकडे नोकरी आहे आहे. कुर्मी जातीतील ३.११ टक्के लोकांकडे नोकरी असून ट्रेड्समन १.९६ टक्के, ०.६३ टक्के सुरजापुरी मुस्लीम, ४.२१ टक्के भांत आणि १.३९ टक्के मलीक मुस्लीम जातीच्या लोकांकडे सरकारी नोकरी आहे.

Bihar Caste Census
CWC Meeting: काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना होणार, राहुल गांधींची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com