काँग्रेसची भारत जोडो यात्रा पुन्हा एकदा सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेसने यासाठी तयारी देखील सुरु केली आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून ही यात्रा सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी या यात्रेच्या स्वरुपात काहीसा बदल केला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसची यावेळची भारत जोडो यात्रा हायब्रिड असण्याची शक्यता आहे. म्हणजे यात्रा कुठं पायी तर कुठे वाहनातून ही यात्रा असणार आहे. काँग्रेसचं नियोजन योग्य पद्धतीने झालं तर ही भारत जोडो यात्रा २.० असेल. यावर्षी डिसेंबरमध्ये ही यात्रा सुरू होऊ शकते आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या सर्वच राजकीय पक्ष ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. लोकसभा निवडणुकीआधीची ही सर्वात मोठी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर लोकसभेच्या दृष्टीने राहुल गांधी यांची भारत जोडो यात्र २.० ही महत्त्वाची ठरु शकते. (Latest Marathi News)
काँग्रेसने सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने भारत जोडो यात्रेची सुरुवात केली होती. ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा १२ राज्यांमधून जात जम्मू-काश्मीरमध्ये १३६ दिवसानंतर ३० जानेवारी २०२३ रोजी संपली होती. या प्रवासात राहुल गांधींसह अनेकांनी ४ हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापले.
काँग्रेसच्या या यात्रेला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. भारत जोडो यात्रा संपल्यानंतर राहुल गांधींनी अनेकवेळा आपले अनुभव शेअर केले. ज्यामध्ये सतत चालल्याने त्यांना काय त्रास झाला याची माहिती ते देत असतात. कदाचित त्यामुळेच राहुल गांधी आणि इतर नेत्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून काँग्रेसने यात्रेचा दुसरा टप्पा हायब्रिड म्हणून निवडला असावा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.