CWC Meeting: काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना होणार, राहुल गांधींची घोषणा

Rahul Gandhi On Caste Census: काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना होणार, राहुल गांधींची घोषणा
Rahul Gandhi News In Marathi
Rahul Gandhi News In Marathi SAAM TV
Published On

Rahul Gandhi On Caste Census:

काँग्रेस शासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. आज काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक पार पडली. चार तास ही बैठक सुरु होती. यानंतर पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी याबाबत घोषणा केली आहे.

याबाबत माहिती देताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, सीडब्लूसी बैठकीत जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. काँग्रेस शासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, त्याची प्रत लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

Rahul Gandhi News In Marathi
Maharashtra Cabinet Expansion: अजित पवार गटाची दिवाळी गोड होणार; पुढील मंत्रिमंडळ विस्तारात १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदांची लॉटरी

ते म्हणाले की, इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांनी जातनिहाय जनगणनेवर सहमती दर्शवली आहे. काही पक्षांचं याबाबत वेगळं मत असू शकतं. आम्ही फॅसिस्ट पक्ष नाही. मात्र युतीतील बहुतांश पक्षांनी जातनिहाय गणनेला सहमती दर्शवली आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी म्हणाले की, ही बाब धर्म किंवा जातीसाठी नाही, गरीब वर्गासाठी महत्वाची आहे. ही जातनिहाय जनगणना गरीब लोकांसाठी आहे. सध्या आपण भारतात आहोत. एक अदानींचा भारत आणि दुसरा गरिबांचा भारत. आम्हाला या नवीन एक्सरेची गरज आहे.

Rahul Gandhi News In Marathi
Toll Naka Issue : लोकांकडून एवढी वर्ष वसूल केलेले टोलचे पैसे गेले कुठे? फडणवीसांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा सवाल

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही 2014 आणि 2015 मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. आमच्या सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत 2018 मध्ये युतीचे सरकार आले. आम्ही समितीच्या अध्यक्षांना ही आकडेवारी जाहीर करण्यास सांगितले. आपल्या चार मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे होते, तर भाजपच्या 10 मुख्यमंत्र्यांपैकी केवळ एकच मुख्यमंत्री ओबीसी आहे. ओबीसी प्रतिनिधित्वातील असमानतेचा मुद्दा मी उपस्थित केला, तेव्हा पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. पंतप्रधान ओबीसींसाठी काम करत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com