Toll Naka Issue : लोकांकडून एवढी वर्ष वसूल केलेले टोलचे पैसे गेले कुठे? फडणवीसांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा सवाल

Toll Naka News Update : एवढा टोल भरूनही राज्यातील रस्त्यांची अवस्था एवढी बिकट का?
Toll Naka
Toll Nakasaam tv
Published On

Congress on Toll :

मनसे टोलवरुन आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरुन काँग्रेस देखील आता आक्रमक झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल वसुलीत झालेल्या भ्रष्टाचाराची एकप्रकारे कबुली दिली आहे, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

राज्यातल्या सर्व टोल नाक्यांवर चारचाकी किंवा छोट्या गाड्यांना टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो. राज्य सरकारने यासाठी पैसे दिले आहेत', असा दावा फडणवीस यांनी केला आहे. मात्र या देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले आहे. (Latest Marathi News)

Toll Naka
Toll Naka: राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेची 'टोल'धाड; टोल न भरताच सोडली वाहने, मनसैनिकांची धरपकड

काँग्रेसने काय म्हटलं?

देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना समजा चारचाकी वाहनांना राज्यातील सगळ्या टोलनाक्यांवर टोल माफ झाला असेल, तर एवढी वर्षं राज्यभरातील लाखो खासगी चारचाकी वाहनचालक-मालक यांच्याकडून टोल घेतला जातो, तो नेमका कोणाच्या खिशात जातो? दर दिवशी टोलच्या माध्यमातून जमा होत असलेली शेकडो कोटींची रक्कम कुठे जाते?

Toll Naka
Raj Thackeray On Toll: ...तर हे सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, काय करायचं ते करा; राज ठाकरे आक्रमक

एवढा टोल भरूनही राज्यातील रस्त्यांची अवस्था एवढी बिकट का? राज्यातील लोकांना रस्त्यांवर, राज्य महामार्गांवर अगदी पायाभूत सुविधादेखील उपलब्ध का नसतात? या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी आपल्या कबुलीतून दिली आहेत.

टोलमधून वसून झालेला हा पैसा नेमका कुठे जातो, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. केंद्रातील ED प्रिय भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या हिताच्या या प्रश्नावर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com