Toll Naka: राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेची 'टोल'धाड; टोल न भरताच सोडली वाहने, मनसैनिकांची धरपकड

Toll Naka News: या अंदोलनादरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Toll Naka
Toll NakaSaam Tv
Published On

MNS News:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झालेत. संपूर्ण नवी मुंबईत मनसैनिकांनी आंदोलनाला सुरूवात केलीये. ऐरोली, ठाणे आणि पनवेल शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या 'टोल'धाडीनंतर अनेक ठिकाणी टोल न भरता वाहने सोडण्यात आलीत. (Latest Marathi News)

Toll Naka
Manoj Jarange Patil Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान! शिष्टमंडळ मुंबईला पाठवणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज मनसे नेत्यांनी आंदोलनास सुरूवात केलीये. ठाण्यात अविनाश जाधव देखील रस्त्यावर उतरले. वाहने टोल फ्री सोडत असताना पोलिसांत आणि त्याच्यात थोडी बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी अविनाश जाधवांना ताब्यात घेतलंय.

ऐरोली टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. येथे चारचाकी वाहनांना टोल न घेता सोडलं. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. शेडुंग टोलनाका येथे देखील मनसेकडून पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी टोलनाक्यावर वाहने टोल न घेता सोडलीत. चिले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पुणे ते कोल्हापुर एकूण टोल

1) खेड शिवापूर - 105 रु

2) अनेवाडी सातारा - 75 रु

3) तासवडे - 75 रु

4) किनी टोल - 75 रु

Toll Naka
Chandra Song School Boy | आधी 'चंद्रा', आता 'गाऊ नको किसना' Jayesh Khare च्या आवाजाची चर्चाच चर्चा..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com