Raj Thackeray On Toll: ...तर हे सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, काय करायचं ते करा; राज ठाकरे आक्रमक

Raj Thackeray News: टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय.
Raj Thackeray On Toll
Raj Thackeray On TollSaam TV
Published On

Mumbai News:

राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. टोलनाक्याच्या प्रश्नावर सोमवारी (९ ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. तसेच टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. (Latest Marathi News)

Raj Thackeray On Toll
Raj Thackeray PC : Toll मुक्त महाराष्ट्रासाठी आक्रमक! राज ठाकरे यांचा भाजपसह शिवसेनेवरही हल्लाबोल

काय म्हणाले राज ठाकरे?

"टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येतंय ते पाहू. फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे कार, चारचाकी,तीनचाकी आणि दुचाकीला टोल नाहीये, तर आमची माणसं रस्त्यावर उतरतील आणि जिथे टोल घेतला जातोय तेथे हे थांबवले जाईल. आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर असे टोलनाके आम्ही जाळून टाकू. पुढे सरकारला जे करायचं त्यांनी ते करावं.", असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे.

फडणवीस धादांत खोटं बोलतायत

टोलनाक्यावर बोलताना राज ठाकरेंनी अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह देवेंद्र फडणवीसांच्या आतापर्यंत टोल नाक्यावरील वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप सादर केल्या. यातील एक व्हिडीओ क्लिप फडणवीसांच्या कालच्या वक्तव्याची होती. फडणवीसांचा व्हिडीओ प्ले केल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

"हे खरं आहे? हे तर धादांत खोटं बोलतायत. मग हे पैसे नेमके कुठे जातायत?, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

"टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती त्यानुसार, राज्यातील सर्व टोलवर चारचाकी तसेच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना मुक्ती देण्यात आलीये. केवळ कमर्शिअल वाहनांवर आपण टोल घेतो.", असं देवेंद्र फडणवीस रविवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते.

Raj Thackeray On Toll
IFFSA Toronto: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदा 'Cue Kya Tha'ची निवड; कलाकाराच्या आयुष्यातील संघर्षाची गाथा सांगणारा चित्रपट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com